Soyabin Bajar Bhav: दोन दिवसांच्या मंदीनंतर सोयाबीन पुन्हा तेजीत, वाशीम बाजारसमितीत मिळाला रेकॉर्डब्रेक बाजारभाव.

Soyabin Bajar Bhav: दोन दिवसांच्या मंदीनंतर सोयाबीन पुन्हा तेजीत, वाशीम बाजारसमितीत मिळाला रेकॉर्डब्रेक बाजारभाव. Soyabin Bajar Bhav: After two days of slump, soybeans rebound, Washim Bazar Samiti gets record break market price.

 

आपल्या देशात मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थान या राज्यांमध्ये ‘सोयाबीन’चे सर्वाधिक उत्पादन होते. याशिवाय बिहार, गुजरात, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश अशी राज्ये आहेत जिथे सोयाबीनचे चांगले पीक घेतले जाते. देशातील आघाडीच्या मंडईत सोयाबीनला आंतरराष्ट्रीय मागणी असल्याने दरात चढ-उतार होत आहेत. सध्या सुरू असलेल्या हंगामात सोयाबीनचा बाजारभाव 6800 रुपयांपर्यंत आहे. बियाणे कंपन्या 9000 रुपयांपर्यंत देखील खरेदी करत असून, मागीलवर्षीच्या तुलनेत या हंगामात सोयाबीनला बाजारपेठत अधिक चांगली मागणी आहे.

‘या’ बाजार समितीत सर्वाधिक दर

आज महाराष्ट्रात सोयाबीन आवक कमी आहे,राज्यात विविध बाजार समित्यांमध्ये शेतकरी सोयाबीन विक्रीसाठी घेऊन येत असून, आज पार पडलेल्या लिलावमध्ये ‘वाशीम’ बाजार समितीमध्ये (Washim Soybean Market Committee) सोयाबीनला सर्वाधिक दर मिळाला आहे. आज 9000 क्विंटल आवक झाली होती, त्यात किमान दर 4650 रुपये, कमाल दर 6700 रुपये क्विंटल तर सरासरी दर 6000 रुपये इतका मिळाला आहे. बाजार समिती खरेदी मधील आजचा हा सर्वाधिक बाजारभाव आहे. दोन दिवसांच्या मंदी नंतर आज सोयाबीन तेजीत आले आहे, येत्या काळात सोयाबीन बाजार आणखी वाढण्याची शक्यता आहे.

मागच्या वर्षी खराब हवामानामुळे सोयाबीन उत्पादनात घट झाली होती, यावेळी या सोयाबीन खाद्यतेलाला परदेशात अधिक मागणी आहे. यामुळे सोयाबीनचे समित्यांत बाजारदर चांगले राहिले आहेत, आज आम्ही कृषी योजना डॉट कॉम या आपल्या वेबसाईटवर तुम्हाला आजचे देशातील व राज्यातील सोयाबीनचे नवीनतम बाजारभाव (Soybean prices) बद्दल सांगणार आहोत –

आजच्या सोयाबीनचा किती दर मिळत आहे.

सध्या सोयाबीनच्या दरात झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाच्या तुटवड्यामुळे सोयाबीनच्या दरात मोठी वाढ झाली आहे. व्यापारी वर्ग व जाणकारांच्या मते, यंदा बाजारात सोयाबीनचा सरासरी भाव प्रतिक्विंटल 6 हजारांवरून 8 हजार रुपये होणार असून, सध्याचा भाव बाजारात स्थिर राहणार असून, कमाल भाव वाढू शकतो. 9000 रुपये प्रति क्विंटलने लवकरच सोयाबीन विक्री होणार आहे. मागील वर्षीच्या तुलनेत दुप्पट आहे. या किमतीत 100/200/300 रुपयांची चढ-उतार दिसून येत आहे. सोयाबीनची किमान आधारभूत किंमत भारत सरकारने 4300 रुपये प्रति क्विंटल निश्चित केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
Don`t copy text!

Adblock Detected

please disable Adblock to proceed to the destination page