VIHIR ANUDAN YOJANA: शेतकऱ्यांसाठी ‘ही’ योजना आहे वरदान, योजनेतुन ‘या’ सात हजाराहुन अधिक शेतक-याना मिळणार विहिरी.
चालू वर्षात चालू आर्थिक उपक्रमातून 7 हजार 95 हजार विहिरींची योजना चालू आहेत. यासाठी 283 कोटी 80 लाखांचा खर्च होणार आहे.
चालू आर्थिक वर्षात रोजगार हमी योजनेतून जिल्ह्यात 7 हजार 95 सिंचन विहिरींची कामे चालू आहेत. यासाठी 283 कोटी 80 लाखांचा खर्च करण्यात येणार आहेत. एका विहिरीसाठी 4 लक्ष रुपये रोजगार हमी योजनेतून खर्च करण्यात येतो. यातून आगामी काळात 7 हजार 95 शेतकरी बागायतदार शेतकरी होणार आहेत. अशी माहिती जिल्हा परिषदेच्या रोजगार हमी विभागातुन देण्यात आली आहे. 40% कुशल आणि 60% अकुशल रक्कम विहिरीसाठी खर्च करण्यात येते. रोजगार हमी योजनेतील कामगारासाठी 60% म्हणजे 2 लाख चाळीस हजार इतकी रक्कम दर आठवड्यास संबंधित कामगारांच्या बँक खात्यावर कामाच्या मोबदल्यात जमा करण्यात येते. ही रक्कम पूर्ण होईपर्यंत मजुरांना या कामाची मजुरी दिली जाते.विहिरीवर बांधण्यात येणाऱ्या काँक्रीट रिंगचे काम पूर्ण झाल्यावर शेतकऱ्याच्या बँक खात्यावर कुशल कामांची 40% म्हणजे 1 लाख 60 हजार इतकी रक्कम वर्ग करण्यात येते. असे जिल्हा परिषदेच्या रोजगार हमी विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
मागील आर्थिक वर्षात अपूर्ण असलेल्या सिंचन विहिरींची संख्या 2 हजार 506 इतकी आहे. चालू आर्थिक वर्षात मंजुरी मिळालेल्या सिंचन विहिरींची संख्या 4 हजार 589 इतकी आहे. यापैकी 1 हजार 342 सिंचन विहिरींचे काम प्रत्यक्षात सुरू झालेले आहे.
मागील आर्थिक वर्षात अपूर्ण राहिलेल्या विहिरी आणि चालू आर्थिक वर्षात मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्षात काम सुरू झालेल्या एकूण विहिरींची संख्या 3 हजार 848 इतकी आहे. मात्र मागील आर्थिक वर्षात अपूर्ण राहिलेल्या विहिरी आणि चालू आर्थिक वर्षात मंजुरी मिळालेल्या विहिरी मिळून एकूण 7 हजार 95 विहिरी भविष्यात निर्माण होऊ शकतात.
मागील आणि आता मंजुरी मिळालेल्या विहिरी 832
भूम तालुक्यात मागील आर्थिक वर्षातील अपूर्ण व चालू वर्षात मंजुरी मिळालेल्या मिळून 832 विहिरी आहेत. कळंब तालुक्यात 930. लोहारा तालुक्यात 298. उमरगा तालुक्यात 398. धाराशिव तालुक्यात 202. परंडा तालुक्यात 2 हजार 121. तुळजापूर तालुक्यात 1 हजार 741. वाशी तालुक्यात 673 इतक्या विहिरींच्या कामांची संख्या आहे. यावरून सर्वाधिक विहिरींच्या कामांची संख्या परंडा तालुक्यात तर सर्वात कमी धाराशिव तालुक्यात आहे.
विहिरीं पूर्ण झाल्यास पाण्याची टंचाई दूर होईल
जिल्ह्यात सध्या तीव्र दुष्काळी परिस्थिती आहे. सर्वत्र पाणीटंचाईची भीषणता जाणवत आहे. या स्थितीत या सर्व विहिरींची कामे पूर्ण झाल्यास आगामी काळात 7 हजारांवर शेतकरी बागायतदार होऊ शकतात. विहिरी पाणीदार होऊ शकतात. परिणामी भविष्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही. असे जाणकारांचे म्हणणे आहे.