पीएम किसान योजना

10 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार 2 हजार रुपये.

10 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार 2 हजार रुपये. Rs 2,000 crore will be deposited in the accounts of 10 crore farmers today.

पीएम किसान सन्मान निधी योजना: शेतकऱ्यांच्या खात्यात 20,000 कोटी रुपये हस्तांतरित केले जातील.

हे ही वाचा…

पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 10व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता त्यांना जास्त वाट पहावी लागणार नाही. केंद्र सरकार नवीन वर्षात पीएम किसान सन्मान निधीचा 10 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात देणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्र सरकार पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच १ जानेवारी रोजी हस्तांतरित करेल. या दिवशी, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 10 वा हप्ता देशातील 10 कोटीहून अधिक शेतकरी कुटुंबांना त्यांच्या खात्यांमध्ये हस्तांतरित केला जाईल. PM मोदी 1 जानेवारी 2022 रोजी दुपारी 12.30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेअंतर्गत आर्थिक लाभांचा 10 वा हप्ता जारी करतील. या अंतर्गत 10 कोटींहून अधिक लाभार्थी शेतकरी कुटुंबांना 20,000 कोटी रुपयांहून अधिक रक्कम हस्तांतरित केली जाईल.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना: १.२४ लाख शेतकऱ्यांना इक्विटी अनुदान दिले जाईल

कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान मोदी सुमारे 351 शेतकरी उत्पादक संस्थांना (FPOs) 14 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचे इक्विटी अनुदान देखील जारी करतील. याचा फायदा 1.24 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना होणार आहे. कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान एफपीओशी संवाद साधतील आणि देशाला संबोधितही करतील. यावेळी केंद्रीय कृषिमंत्रीही उपस्थित राहणार आहेत.

पीएम किसानचा 10 वा हप्ता: लाभार्थी यादीत तुमचे नाव कसे तपासायचे ते पहा.

पीएम किसान सन्मान निधीच्या लाभार्थी यादीत तुमचे नाव आहे की नाही हे तुम्ही सहज तपासू शकता. यासाठी तुम्हाला खाली नमूद केलेल्या काही गोष्टी फॉलो कराव्या लागतील.
सर्वप्रथम पीएम किसानच्या या खालील वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर जा. याठिकाणी होमपेजवर, फार्मर्स कॉर्नर या पर्यायावर, लाभार्थी यादीच्या लिंकवर क्लिक करा.
आता तुम्ही सूचीमधून तुमचे राज्य, तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव निवडा.
त्यानंतर अहवाल मिळवा या पर्यायावर क्लिक करा.
त्यामध्ये लाभार्थ्यांची संपूर्ण यादी तुम्हास तुमच्या स्क्रीनवर दिसेल,त्यामध्ये तुमचे नाव तपासा.

PM किसान सन्मान निधी योजना: तुमच्या हप्त्याची स्थिती कशी तपासायची

जर तुम्ही पीएम किसान योजनेत नोंदणी केली असेल तर तुम्ही या योजनेच्या लाभार्थी यादीत तुमचे नाव तुम्ही तपासू शकता. येथे दिलेल्या संपूर्ण प्रक्रियेचे अनुकरणं करून,आपण सूचीमध्ये आपले नाव सहजपणे बघू शकता.
• तुम्हाला तुमच्या हप्त्याची स्थिती बघण्यासाठी प्रथम PM किसानच्या https://pmkisan.gov.in/ या वेबसाइटवर जा.
•यानंतर उजव्या बाजूला Farmers Corner या पर्यायावर क्लिक करा.
• यानंतर तुम्ही तुमच्या लाभार्थी स्थिती या पर्यायावर क्लिक करा.
•   आता तुमच्यासोबत एक नवीन पेज उघडेल.
• याठिकाणी आपण आपला आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक टाका.
• या सर्व प्रक्रियेनंतर तुम्ही तुमच्या स्टेटसची संपूर्ण माहिती पाहू शकता.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करून देशातील 10 करोड शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 20 हजार करोड रुपये जमा करणार असल्याचे सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Don`t copy text!