मान्सून पाऊस 2021शेती विषयकहवामान

राज्यातील ‘ या ‘ तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस; पेरण्या करता येणार.

 

टीम कृषी योजना / Krushi Yojana

नैऋत्य मोसमी पाऊसाचे राज्यात आगमन होऊन संपूर्ण राज्य व्यापुन अनेक विभागात कमी अधिक प्रमाणात पाऊसास सुरुवात झाली असून जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यात जवळपास 218 तालुक्यांमध्ये 100 टक्क्यांपेक्षा अधिक प्रमाणात पाऊस झाला आहे.पेरनीयोग्य दमदार पाऊस झाल्याने राज्यात अनेक तालुक्यामध्ये शेती कामांना वेग आला असून पेरण्या करताना शेतकरी दिसत आहेत.

1 ते 14 जून च्या दरम्यान अनेक जिल्ह्यांमधील 218 तालुक्यात 100 टक्के पाऊस पडला.
परभणी, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, बीड ,चंद्रपूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, वाशीम, बुलडाणा, हिंगोली,सोलापूर,अहमदनगर, पालघर, रत्नागिरी, ठाणे, जालना, औरंगाबाद, सांगली, या जिल्ह्यांमध्ये पेरनियोग्य पाऊस झाला आहे.

ही माहिती नक्की पहा – CNG gas to be produced from grass गवतापासून तयार होणार CNG गॅस ; शेतकऱ्यांकडून ‘ या ‘दराने विकत घेणार गवत.

या सप्ताहात विदर्भातील गोंदिया, अकोला, भंडारा, तर पश्चिम महाराष्ट्रात सातारा, पुणे याशिवाय धुळे, सिंधुदुर्ग, रायगड, जिल्ह्यांत ७५ ते १०० टक्के इतका पाऊस पडला आहे. त्या खालोखाल नाशिक, जळगाव व कोल्हापूर तसेच गडचिरोली जिल्ह्यात ५० टक्क्यांच्या आत पाऊस पडला तर सर्वांधिक कमी नंदूरबार मध्ये पाऊस झाला.त्याचे प्रमाण २५ टक्क्यांच्या आत आहे.

राज्यात जूनच्या पहिल्या आठवड्यात सरासरी 96 मिलिमीटर पाऊस होत असतो.परंतु या वर्षी 118 मिलिमीटरच्या दरम्यान पाऊस झाला. एकूण सरासरीच्या 120 टक्के पाऊस पडला.नाशिक विभागात भात व नागलीच्या रोपवाटिका तयार करण्यात येत आहेत.सोलापूर,अहमदनगर व मराठवाड्यात काही भागात मका व कपाशीच्या पेरण्यादेखील सुरू झाल्या आहेत.

वरील माहिती आवडल्यास इतर शेतकरी बांधवासमवेत नक्की शेअर करा.

महत्वाची बातमी नक्की पहा – कांद्याच्या भावात वाढ होण्याची शक्यता ; या कारणामुळे होऊ शकते वाढ

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Don`t copy text!