Today’s onion price: 14 हजार रुपये क्विंटलने विकला नवीन लाल कांदा, शेतकऱ्याला हार व फेटा बांधून झाला लिलाव, पहा बातमी व व्हिडीओ.
कृषी उत्पन्न बाजार समिती रतलाममध्ये नवीन लाल कांद्याचा लिलाव करण्यात आला. या हंगामात प्रथमच, रतलामच्या कृषी उत्पन्न बाजारामध्ये दाखल झालेल्या नवीन लाल कांद्यास लिलावाच्या सुरुवातीलाच 1,4001 रुपये प्रति क्विंटलवर पोहोचला. नवीन लाल कांदा विक्रीस घेऊन आलेल्या शेतकऱ्याचे पुष्पहार व फेटा बांधून स्वागत करण्यात आले आणि व्यापाऱ्यांनी हंगामातील पहिल्या नवीन कांद्यासाठी उत्साहाने बोली लावली. रतलाम येथील कृषी उत्पन्न बाजारामध्ये नवीन कांद्याची विक्रमी बोली लागल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची होता.
देशात अनेक राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन कांद्याची आवक सुरू झाली आहे. यासह रतलाम मंडईत नवीन कांद्याची पहिल्या आवकेस 14,001 रुपये प्रति क्विंटल इतका उच्चांकी दर मिळाला. यावेळी राज्यातील अनेक भागात कांद्याची लागवड कमी झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. पूर्वी जिथे कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात होत असे, यावेळी काही मोजकेच शेतकरी कांद्याची लागवड करत आहेत. ज्या शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड केली होती त्यांचे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यावेळी कांद्याच्या भावाने विक्रम मोडीत काढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महाराष्ट्रात अजूनही उन्हाळी कांदा विक्रीस येत आहे, आवक मोठ्या प्रमाणात आहे, दिवाळीनंतर बाजार समित्यांमध्ये लिलाव सुरू झाल्यावर कांद्याच्या दरात वाढ होत आहे, प्रती क्विंटल 1 हजार रुपयांनी भाववाढ झाल्याचे चित्र अनेक बाजार समित्यांमध्ये आहे. लासलगाव,मनमाड,अहमदनगर, सोलापूर, घोडेगाव याठिकाणी कांद्यास 3500 ते 3600 रुपये प्रती क्विंटल पर्यंत उच्चांकी दर मिळाला आहे. महाराष्ट्रात लाल कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने उन्हाळी कांदा भाव खाणार असे बोलके चित्र आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.