Sugarcane production: आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आता एकरी 200 टन उसाचे उत्पादन मिळणे शक्य, पहा शास्त्रज्ञ काय म्हणतात.

Advertisement

Sugarcane production: आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आता एकरी 200 टन उसाचे उत्पादन मिळणे शक्य, पहा शास्त्रज्ञ काय म्हणतात.

योग्यवेळी अचूक खते, सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि ऊस लागवडीचे आधुनिक तंत्र वापरल्यास शेती फायदेशीर ठरू शकते, व त्याद्वारे एकरी 200 टन ऊस उत्पादन मिळणे शक्य आहे, या पद्धतीद्वारे प्रती एकरी 200 टन उसाचे उत्पादन घेणे आता सहज शक्य होणार आहे, असे मत कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख व ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.कलावडे यांनी व्यक्त केले, शेतकऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

Advertisement

शिरोळ येथील श्री दत्त कारखान्याच्या वतीने ‘झेप 200 टन’ या योजनेत सहभागी होणाऱ्या सभासदांसाठी ‘जमिनीची पोषक द्रव्ये आणि उत्पादकता वाढवण्यासाठीचे आधुनिक तंत्र’ या विषयावर बैठक आयोजीत करण्यात आली होती.
यावेळी डॉ.मालेकर बोलत होते,कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री.दत्त कारखान्याचे उदयनपंडित गणपतराव पाटील हे होते.

शाश्वत ऊस लागवडीसाठी शेतकऱ्यांना उसशेतीसाठी रासायनिक व सेंद्रिय खतांचा संतुलित आहार, योग्य लागवड पद्धत, उसाची वाढ, आळवणी, फवारणी आणि सेंद्रिय खतासह, नांगरणी,मशागत याविषयी योग्य प्रशिक्षण दिले जाणार आहे.

Advertisement

कार्यक्रमाच्या वेळी बोलताना पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांनी सुपर केन नर्सरीची माहिती घेऊन आपली रोपवाटिका तयार करावी. योग्य खते, पाणी, पोषक व्यवस्थापन समजून घेऊन आणि सेंद्रिय कर्ब वाढविण्याच्या दिशेने काम करून, आपण आपल्या चांगल्या शेतीची सुपीक जमीन पुढच्या पिढीपर्यंत देऊ शकतो.

‘माती परीक्षणावर आधारित ऊस लागवड’ याबाबत बोलताना ए. एस. पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मुख्य कृषी अधिकारी श्रीशैल हेगण्णा यांनी जमिनीची सुपीकता यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

please disable Adblock to proceed to the destination page