‘मागेल त्याला शेततळे’ योजना पुन्हा सुरू, योजनेचे नाव बदलले व अनुदानाच्या रकमेत झाली मोठी वाढ.
‘मागेल त्याला शेततळे'( Magel Tyala Shettale) ही महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली योजना, या योजनेमुळे महाराष्ट्र राज्यातील हजारो शेतकऱ्यांना शेततळे उभारण्यासाठी लाभ मिळाला होता. या योजनेचा लाभ घेऊन अनेक शेतकऱ्यांनी जिरायत शेती बागायत केली, योजनेमुळे राज्यात शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला, परंतु गेल्या काही वर्षांपासून बंद असलेली ही योजना सूरु करावी अशी मागणी वारंवार होत होती, आता ही योजना पुन्हा नव्याने सुरू करण्याचा निर्णय झाला असून त्यासंदर्भात शासन आदेश निघाला असल्याची माहिती, राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.
शासनाने निधीची अडचण निर्माण झाल्याने सन 2020 पासून ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना बंद केली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडत होती, योजना सुरू करण्यासंदर्भात शेतकऱ्यांकडून वारंवार मागणी होत होती आता ही योजना सुरू होणार असून योजना सुरू करण्याचे आदेश राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. त्यानुसार राज्य सरकारने ही योजना पूर्ण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शासकीय अधिकाऱ्यांच्या घेतलेल्या बैठकीमध्ये ही योजना सुरुवात करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करू आणि सांगितले होते त्यानुसार विखे पाटील यांनी शासन दरबार पाठपुरावा केला व त्यांनी ही योजना सुरू केली आहे.
मागील दोन वर्षापासून बंद झालेली ‘मागेल त्याला शेततळे योजना’ पुन्हा नव्याने ‘मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना'( Mukhyamantri Shasvat Sinchan Yojana ) या नवीन नावाने सुरू करण्याचा निर्णय झाला असून त्या संदर्भात शासन आदेश देखील झाला आहे.
योजनेचे उद्दिष्ट
दोन वर्षे असलेली शेततळ्यांची योजना ‘मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना'( Mukhyamantri Shasvat Sinchan Yojana )या नवीन नावाने सुरू झाली असून योजनेअंतर्गत राज्यात 13500 वैयक्तिक शेततळी एक वर्षभरात करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या संदर्भात जिल्हा निहाय कृषी अधीक्षक कार्यालयांनाही कळवण्यात आले असून अहमदनगर जिल्ह्यात 930 शेततळी देण्यात येणार आहेत.
शेतकऱ्यांसाठी मिळणाऱ्या अनुदानाच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, यापूर्वी शेतकऱ्यांसाठी कमाल पन्नास हजार रुपये अनुदान दिले जात होते, आता त्यात 25 हजार रुपयांची वाढ करण्यात आली असून शेततळ्यासाठी शेतकऱ्यांना 75 हजार रुपये अनुदान स्वरूपात मिळणार आहेत, हे पैसे थेट आयुक्तालयामधून शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले जाणार आहेत.
‘मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना'(Mukhyamantri Shasvat Sinchan Yojana) या नावाने सुरू करण्यात आलेल्या योजनेअंतर्गत राज्यात एकूण 13500 व्यक्तिक शेततळे या वर्षभरात करण्याचे उद्दिष्ट आहे.त्यानुसार अनुसूचित जातीसाठी 1010,अनुसूचित जमातीसाठी 770, तर सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी 11720 असे वाटप असणार आहे. लाभार्थ्यांना महाडीबीटी पोर्टलवरून अर्ज करावा लागणार आहे.