Kanda Bajar Bhav: कांद्याच्या भावात घसरण; आठ दिवसांत पाचशे रुपयांची घसरले कांद्याचे बाजार. Kanda Bajar Bhav: Fall in onion prices; Onion market fell by Rs 500 in eight days.
आठ दिवसांत कांद्याच्या दरात(Kanda Bajarbhav) प्रति क्विंटल 400 ते 500 रुपयांची घसरण झाल्याने उत्पादकांची चिंता वाढली आहे. दिवाळीनंतर कांदा बाजारात लिलाव सुरू झाल्यावर भाव अपेक्षेप्रमाणे वाढले. कांद्याला सरासरी 2800 रुपये प्रतिक्विंटल, तर किमान 1000 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. मात्र गेल्या पाच-सहा दिवसांपासून कांद्याचे भाव प्रतिक्विंटल 400 ते 500 रुपयांनी घसरले आहेत.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 4 नोव्हेंबर रोजी उन्हाळ कांद्याला किमान 1001 रुपये, कमाल 3260 रुपये तर सरासरी 2540 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला होता. शनिवारी (दि. 12) किमान भाव 700 रुपये, कमाल भाव 2652 रुपये आणि सरासरी भाव 1850 रुपये होता. याशिवाय 4 नोव्हेंबर रोजी उन्हाळ कांद्याची आवकही अधिक होती. त्या तुलनेत शनिवारी आवक निम्मीच होती. आवक घटल्याने कांद्याचे भाव वाढण्याऐवजी 400 ते 500 रुपये प्रतिक्विंटलने घसरले आहेत. पिंपळगाव बाजार समितीतही 4 नोव्हेंबर रोजी उन्हाळ कांद्याला किमान 1500 रुपये, कमाल 3650 रुपये तर सरासरी 2650 रुपये भाव मिळाला होता. शनिवारी किमान 1300, कमाल 3020, सरासरी किंमत 2100 रु. मिळाला आहे.
नवीन लाल कांद्याची (New Red Onion )आवक सुरू झाल्यामुळे,उन्हाळी कांद्यास मागणी कमी होत आहे, कर्नाटकसह महाराष्ट्रात देखील लाल कांदा विक्रीसाठी येत आहे,नवीन कांदा कमी दरात मिळत असल्याने उन्हाळी कांदा खरेदीसाठी ग्राहक कमी असल्याचे बाजारसमित्यामध्ये चित्र आहे.