KrushiYojanaWeather forecast Maharashtraहवामान

शेतकऱ्यांना आनंदाची वार्ता ,यंदाचा मान्सून केरळ मध्ये दाखल

कृषीयोजना / KrushiYojana 

पाऊसाची आतुरतेने वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची वार्ता असून, भारतीय हवामान विभाग कडून प्राप्त माहिती नुसार यंदाचा मान्सून (Monsoon 2021 ) केरळमध्ये दाखल झाला असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. Good news for farmers, this year’s monsoon arrives in Kerala
दक्षिण केरळ च्या भागात मान्सून सक्रिय झाला असून,यंदाचा मान्सून केरळमध्ये दोन दिवस उशिरा दाखल झाला.अशी माहिती हवामान विभागा कडून मिळाली.

भारतीय हवामान विभागाचे कार्यकारी संचालक मृत्यूंजय मोहपात्रा यांनी पीटीआय वृत्तसंस्थेस दिलेल्या माहिती वरून केरळच्या दक्षिण भागात मान्सून दाखल झाला आहे. महाराष्ट्रात 7 दिवसात दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

यंदाचा मान्सून केरळमध्ये 1 जून रोजी दाखल होईल, असं म्हटलं होत.परंतु त्यानंतर 31 मे रोजी मान्सून दाखल होईल, असं सांगण्यात आलं होत परंतु 3 जूनला मान्सून दाखल झाला आज पर्यंत बहुतांश वेळेस मान्सून 1 जूनला दाखल होतो, यावेळी दोन दिवस उशिरानं केरळमध्ये दाखल झाला. मान्सून दक्षिण अरबी समूद्र, लक्षद्वीप, दक्षिण केरळ, दक्षिण तामिळनाडू, कोमोरिन, मालदिव या भागात सक्रिय झाला असल्याचे भारतीय हवामान विभागाकडून सांगण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Don`t copy text!