CNG gas to be produced from grass गवतापासून तयार होणार CNG गॅस ; शेतकऱ्यांकडून ‘ या ‘दराने विकत घेणार गवत.

CNG gas to be produced from grass

Advertisement

CNG gas to be produced from grass; Grass will be purchased from farmers at this rate.

टीम कृषी योजना/krushi yojana

Advertisement

माजलगाव तालुक्या मध्ये गवतापासून सीएनजी गॅस तयार करणाऱ्या प्रकल्प सुरू होणार आहे.सीएनजी प्रकल्पाच्या उभारणीत माजलगाव तालुक्यातील शेकडो तरुणांना रोजगाराची संधी मिळणार असून हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरणार आहे.( CNG gas to be produced from grass; Grass will be purchased from farmers at this rate. )

शेतकऱ्यांनी शेतात उत्पादित केलेल्या गजराज गवतापासून सीएनजी गॅस तयार करणे व सेंद्रिय खत तयार करणे हा कंपनीचा उद्देश आहे.

Advertisement

गजराज या गवतापासू तीन महिन्यात गॅस निर्मिती होते. त्यामुळे इतर पिकांपेक्षा शेतकऱ्यांना गजराज गवत, कांडी गवत, हत्ती गवत असे वर्षभरात चार उत्पन्न घेता येतात. शेतकऱ्यांना एका टनामागे एक हजार रुपयांचा दर दिला जाणार आहे. हे उत्पन्न मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना करावी लागणारी गुंतवणूक अत्यल्प आहे.

शेतात विविध पिके घेऊन बियाणे,औषधे,खते याच बरोबर मुबलक पाणी व मनुष्यबळ लागते.त्यातून मिळणारे उत्पन्न शाश्वत नसते परंतु या सर्व ससेमिऱ्यातुन सुटका होणार आहे.हा प्रकल्प माजलगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे.

Advertisement
ही माहिती नक्की पहा – हेक्टरी 39 क्विंटल उत्पन्न देणारे नविन सोयाबीन बियाणे | शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार | पुणे येथील संस्थेने लावला शोध.

त्याचबरोबर या महत्वाकांक्षी प्रकल्पातुन तालुक्यातील जवळपास आठशे ते एक हजार सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार मिळणार आहे.
जुलै 2021 मध्ये या प्रकल्पाच्या कामास सुरुवात होणार आहे. जानेवारी 2022 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल अशी माहिती संचालक सौरभ जाधव यांनी दिली.

या प्रकल्पासाठी 10 हजार शेअर्सची विक्री कंपनी करत आहे. शेतकऱ्यांना प्रति शेअर पाचशे रुपये प्रमाणे आतापर्यंत 4 हजार 500 शेअर्स विक्री झाले आहेत. राज्यात प्रत्येक तालुक्यात असा एक जरी प्रकल्प झाला तर शेतकऱ्याबरोबर तालुक्यातील युवकांचाही फायदा होईल.

Advertisement

Related Articles

Back to top button

Adblock Detected

please disable Adblock to proceed to the destination page