राज्यात लवकरच सर्वदूर पाऊसास होणार सुरुवात ; हवामान अभ्यासक पंजाब डख यांचे सूतोवाच.

Advertisement

 

टीम कृषी योजना / Krushi Yojana.

Advertisement

महाराष्ट्रातील हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी काल महाराष्ट्रात पाऊस सुरू होणार हा अंदाज तंतोतंत खरा ठरला असून,महाराष्ट्रातील विविध विभागात कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू झाला आहे.

काय अंदाज वर्तवला होता पंजाब डख यांनी.?

नैऋत्य मोसमी पाऊस म्हणजेच मान्सून Southwest monsoon ने राज्यात वेळेवर धडक दिली. राज्यातील अनेक जिल्ह्यात विभागात कमी अधिक प्रमाणात पाऊस पडला आहे. आजही राज्यात अनेक भागात पाऊस नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत,काहींनी पेरणी केली असून पाऊसाअभावी दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले ( Due to lack of rain, there is a crisis of double sowing ) असताना गेल्या काही वर्षांपासून राज्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेले हवामान तज्ञ पंजाब डख ( Panjab Dakh ) यांनी आपला हवामान अंदाज वर्तविला आहे.

Advertisement

उद्या रविवार दि.27 जून पासून राज्यात चार दिवस भाग बदलत पाउस पडणार असून दि .27,28, ,29,30 या तारखे पासून विदर्भ पूर्वविदर्भ, प. विदर्भ , उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा , प.महाराष्ट्र व राज्यातील तुरळक भागात पावसाचे आगमण होईल असा अंदाज आहे.( Rains are expected in Vidarbha, Maharashtra, Marathwada, West Maharashtra and sparse parts of the state. )

दि.27,28,29,30 रोजी पडणारा पाउस सर्वदूर नसेल. पेरणी झालेल्या पिकांना या पावसाने जिवदान मिळेल.राज्यात 6 जुलै पासून सर्वदूर पावसासाठी पोषक वातावरण तयार होईल. ज्यांची पेरणी राहीली त्यांची पेरणी, लागवड या पावसावर होइल. पिकांना आवश्यक असेल तसा पाऊस जुलै मध्ये पडेल व ऑगस्ट सप्टेंबर मध्ये जास्त पाउस होईल.( Rainfall will fall in July as required by the crops and more rain in August-September. )

Advertisement

परतीचा पाउस ऑक्टोबर मध्ये उत्तर महाराष्ट्रातून निघेल. पूर्वविदर्भ व मराठवाड्यात ऑक्टोबर मध्ये पाउस राहील. 3 नोव्हेबंर पासून थंडीस सुरवात होईल असा पाउस राहील. शेतकऱ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी जून मध्ये पाउस झाला नाही तर जुलै मध्ये होणार.

ऑगस्ट सप्टेंबर दर वर्षी पाऊस जास्त असतो. ऑक्टोबर मध्ये राज्याच्या पूर्व भागात पाउस पडतो. व नोव्हेबंर मध्ये थंडी येते रब्बी पेरणी होते. असा अंदाज पंजाब डख यांनी वर्तविला आहे.शेतकऱ्यांना माहीती व्हावी यासाठी माहीतीस्तव अंदाज दिले आहेत – पंजाब डख ( Panjab Dakh )

Advertisement

वर दिलेले अंदाज विभागनूसार आहेत गावानुसार नाहीत माहीत असावे.

असे अंदाज पंजाब डख ( Panjab Dakh Weather Forecast ) यांनी वर्तविले असून,शेतकऱ्यांनी हवामान विभाग,पंजाब डख व स्वतःच्या अनुभवातून शेतीची कामे करावीत. वरील अंदाज हे फक्त पंजाब डख यांचे अंदाज आहेत. आम्ही आपणा पर्यंत पोहोचविण्याचे काम करत आहोत.

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

please disable Adblock to proceed to the destination page