कृषी सल्लाशेती विषयक

शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी कधी करावी? कृषी विभागाचा महत्वाचा सल्ला.

 

टीम कृषी योजना /krushi yojana

कृषी विद्यापीठाच्या अभ्यास व निष्कर्षा नुसार बियाणे उगवणीसाठी जमिनीमध्ये पुरेसा ओलावा व त्यासाठी कमीतकमी 80 ते 100 मि.मी.पाऊस होण्याची आवश्यकता असते.

मोलाचा सल्ला नक्की पहापंजाब डख यांचा नवा हवामान अंदाज | जून महिन्यात पाऊसाचा अंदाज | कुठे व किती पाऊस पडेल | संपूर्ण महाराष्ट्राचा अंदाज

ही बातमी नक्की वाचानाशिकचा कांदा निघाला बांगलादेश ला | क्विंटलला काय भाव मिळाला | 

यंदा खरीप हंगामामध्ये सोयाबीन पिकाची पेरणी करताना शेतकऱ्यांनी ही काळजी घेतली पाहिजे जेणेकरून दुबार पेरणीचे संकट येणार नाही. कमीतकमी 80 ते 100 मि.मी पाऊस जो पर्यंत पडत नाही तोपर्यंत सोयाबीन पेरणी करु नका, असं आवाहन कृषी विभागा मार्फत केलं जातं आहे.

जो पर्यंत 80 ते 100 मि.मी. पाऊस पडत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करू नये, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने केले आहे. ८० ते १०० मी.मी पेक्षा कमी पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणी केल्यास पुरेशा प्रमाणात ओलावा राहत नाही.परिणामी जमिनीच्या उष्णतेमुळे बियाणांना अत्यल्प प्रमाणात अंकुर फुटतात. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार बियाणे पेरण्याची वेळ येवू शकते.

दुबार पेरणी करण्याची वेळ शेतकऱ्यावर आल्यास यामध्ये त्या शेतकऱ्याचे कष्ट,वेळ व पैसा खर्च होतो. उत्पादनात घट होण्याची शक्यता असते त्यामुळे जमिनीत पुरेशी ओल असल्याशिवाय पेरणी न करने फायद्याचे ठरेल.

वरील माहिती आवडल्यास इतर शेतकरी बांधवांना नक्की पाठवा.आणखी कुठल्या विषयावर माहिती हवी असेल तर खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की कमेंट करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Don`t copy text!