घोडेगावचा प्रसिद्ध जनावरांचा बाजार होणार सुरू, शेतकरी,पशुपालक व व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आनंद.

Advertisement

घोडेगावचा प्रसिद्ध जनावरांचा बाजार होणार सुरू, शेतकरी,पशुपालक व व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आनंद.

संदर्भ – दैनिक पुढारी.

Advertisement

गेल्या साडेतीन महिन्यापासून बंद असलेला घोडेगावचा जनावरांचा बाजार शुक्रवार दि. २३ डिसेंबर २०२२ पासून सुरू होणार असल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. गाई,म्हशी,शेळी,मेंढी यांचा बाजार नियमित सुरू होणार आहे, बाजार सुरू होणार असल्याने शेतकरी,पशुपालक, व्यापारी,दलाल व व्यवसाईकांनी आनंद व्यक्त केला व बाजार सुरू करण्यासाठी प्रयत्न करणारे नेवासा तालुक्याचे आ.शंकरराव गडाख यांचे आभार मानले.

राज्यात व अहमदनगर जिल्ह्यात ३ महिन्यांपूर्वी लंपी आजाराने थैमान घातले होते, त्वचेच्या या घातक आजाराने नेवासा तालुक्यात देखील थैमान घातले, अनेक शेतकऱ्यांची जनावरे मरण पावली, आजाराचा वाढता प्रसार व घातकता लक्षात घेता, प्रशासनाच्या वतीने ०९ सप्टेंबर २०२२ रोजी पासून नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील जनावरांचा बाजार बंद ठेवण्यात आला होता, जिल्हा प्रशासनाने राबवलेल्या विविध उपाययोजना व प्रतिबंधात्मक उपचार,लसीकरण यामुळे लंपी आजार आटोक्यात आला आहे, शेतकरी व व्यापारी वर्गाची बाजार सुरू करण्याची मागणी होती,आ.शंकरराव गडाख यांच्याकडे शेतकरी व व्यापारी बाजार सुरू करण्याची मागणी करत होते,लवकर बाजार सुरू होईल असा शब्द आ.गडाख यांनी शेतकरी व व्यापाऱ्यांनी दिला होता, बाजार सुरू करण्याची मागणी लक्षात घेऊन  बाजार सुरू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला असून शुक्रवार पासून बाजार सुरू करण्यात येणार आहे.

Advertisement

बाजार सुरू होणार असल्याने शेतकरी,पशुपालक,व्यापारी,दलाल,व्यवसायिक यांनी आनंद व्यक्त केला,अनेक महिन्यापासून बाजार बंद असल्याकारणाने बाजारावर अवलंबून असणाऱ्या सर्व घटकांना अडचणींचा सामना करावा लागत होता,खेड्यावर गाई,म्हशी विक्री करण्यावर निर्बंध असल्याने त्रास होत होता.शेतकऱ्यांना व पशुपालकांना मोठा आर्थिक फटका बसला, बाजार सुरू होत असल्याने सर्वांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

घोडेगाव ता नेवासा येथील गाई,म्हशी बाजारावर नेवासा तालुक्यासह ,जिल्हा भरतील अनेक गावांचे अर्थकारण अवलंबून आहे. सदर बाजार तातडीने सुरू व्हावा यासाठी आ शंकरराव गडाख यांनी प्रयत्न केले सदर बाजार सुरू होणार असल्याने शेतकरी, पशुपालक,व्यवसायिक,यांच्यामध्ये समाधानाचे वातावरण आहे.

Advertisement

Ghodegaon famous animal market will start, farmers, cattle breeders and traders expressed happiness.

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

please disable Adblock to proceed to the destination page