टीम कृषी योजना / krushi yojana
शेतामध्ये कष्ट करून घाम गाळून मोठे उत्पन्न मिळावे अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असते.दरवर्षीच मोठे उत्पन्न होईल असे नाही.कधी पाऊस कमी तर कधी बियाने चुकीचे मिळते,अशा वेळी शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होतेच परंतु त्याच बरोबर श्रम व वेळ ही वाया जाते. शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे, पुणे शहरातल्या एका संस्थेने नवीन सोयाबीन वानाची ( बियानाची ) निर्मिती केली आहे. पुणे येथील या संस्थेचे नाव आहे आगरकर इन्स्टिट्यूट . पुणे येथील प्रसिद्ध इन्स्टिट्यूट पैकी एक असलेले आगरकर इन्स्टिट्यूट.
जो शेतकरी बांधव सोयाबीनचे पीक नियमित घेतात त्यांच्यासाठी ही बातमी आनंदाची बातमी आहे.
महत्वाची योजना नक्की पहा – पैसे नसले तरीही जमीन खरेदी करू शकता | या योजनेद्वारे व्हा जमिनीचे मालक.
हेक्टरी तब्बल 39 क्विंटल एवढे उत्पादन मिळणारी व रेग्युलर सोयाबीनच्या जाती पेक्षा ही जात जास्त फायद्याचे ठरणार आहे आणि शेतकरी लोकांना या नव्या वाणाचा फायदा होणार आहे.
पुणे येथील आगरकर इन्स्टिट्यूट या संस्थेने शोध लावलेल्या सोयाबीनच्या वानाचे नाव आहे MACS 1407. पुणे शहरातील संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांनी MACS 1407 या नव्या बियाणांचा ( वानाचा ) शोध लावला आहे. या नव्या वाणाचे सोयाबीन लावल्यामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी 39 क्विंटल एवढे उत्पादन मिळणार आहे असा अंदाज पुण्यातील या संस्थेच्या शास्त्रज्ञांनी लावला असून विविध प्रजातींचे कीड व रोगराई पासून सौरक्षण होईल असे नवीन तंत्रज्ञान वापरून नवीन वाणाची निर्मिती केल्याचा संशोधकांचा दावा आहे. आता हे सोयाबीनचे नवीन वाण बाजारात विक्रीसाठी कधी येते या कडे शेतकरी बांधवांचे लक्ष लागले आहे.
2 thoughts on “हेक्टरी 39 क्विंटल उत्पन्न देणारे नविन सोयाबीन बियाणे | शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार | पुणे येथील संस्थेने लावला शोध.”