Advertisement
Categories: KrushiYojana

Sbi Land purchase scheme in marathi | पैसे नसले तरीही जमीन खरेदी करू शकता | या योजनेद्वारे व्हा जमिनीचे मालक.

Advertisement

Sbi Land purchase scheme in marathi | You can buy land even if you don’t have money Become a land owner through this scheme.

टीम कृषी योजना / krushi Yojana

Advertisement

देशाचे अर्थ गणित व जनतेच्या पोटाची भूक भागवते ती आपली काळी माती म्हणजेच शेती व शेतकरी. ग्रामीण भागाचा कणा असलेली शेती सर्वांकडेच असते असे नाही.काहींकडे कमी प्रमाणात असते तर काहींकडे नसते अशा वेळी ग्रामीण भागातील प्रत्येकाला स्वतःची शेतजमीन असावी त्यात आपले छोटेसे घर ,गोठा असावा असे स्वप्न असते.अनेक शेतकऱ्यांना शेतजमीन खरेदी करण्याची इच्छा असली तरी अनेकदा पैशाअभावी देखील त्यांना जमीन खरेदीसाठी मोठी अडचण निर्माण होत असते.

अशाच छोट्या शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेली स्टेट बैंक ऑफ इंडियाने एक महत्वपूर्ण योजना आणली आहे. ( Sbi Land purchase scheme )

Advertisement

यामुळे आपल्याकडे पैसे नसताना देखील शेत जमीन खरेदी करून शेतजमीनीचे मालक होता येणे शक्य झाले आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया ने आणलेल्या या योजनेला ‘जमीन खरेदी योजना’ असे नाव दिले असून बँकेच्या वेबसाईटवर याची सविस्तर माहितीही देण्यात आलेली आहे.

Sbi जमीन खरेदी योजनेचा उद्देश

SBI च्या जमीन खरेदी योजना (Sbi Land Purchase Scheme) या योजनेचा हेतू हा आहे की, लहान शेतकऱ्यांना जमीन खरेदी करण्यास मदत करणे. किंवा ज्यांच्याकडे शेतीयोग्य जमीन नाही अशा शेतकऱ्यांना शेतीयोग्य जमीन खरेदीसाठी मदत करणे. या योजनेचा लाभ घेताना महत्वाची अट ही आहे की अर्जदारावर दुसऱ्या कुठल्याही बँकेचे कर्ज नसावे.

Advertisement

जमीन खरेदी सोबत या गोष्टींसाठी मिळेल कर्ज.

1. जमीन खरेदी करण्यासाठी मिळेल कर्ज.

2. जमीन विकास, सिंचन विकास (या गोष्टींची किंमत जमिनीच्या एकूण ५० टक्के पेक्षा जास्त नसावी )

Advertisement

3. शेती अवजारे खरेदी साठी

4. जमीन नोंदणी फी साठी

Advertisement

5. गहाण जमीन खरेदी करण्या साठी

6. कर्जाच्या रक्कमेवर ८५ टक्के कर्ज मिळू शकेल.

Advertisement

योजनेसाठी पात्र असलेले शेतकरी

1. लहान व अल्पभूधारक शेतकरी ज्यांच्याकडे ५ एकरपेक्षा कमी कोरडवाहू शेती किंवा २.५ एकरपेक्षा कमी सिंचित जमीन आहे.

2. लाभ घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्ती / शेतकऱ्याने मागील दोन वर्षापासून नियमित पणे कर्जाची परतफेड केलेली असावी.

Advertisement

3. इतर बँकेत खाते असणाऱ्यांना या योजनेचा लाभ हवा असल्यास इतर बँकेतील कर्ज खाते बंद करावे लागेल ही विशेष अट आहे.

वरील योजनेची माहिती आवडल्यास इतर शेतकरी बांधवांना नक्की पाठवा.
योजना सुरू आहे की नाही याबाबत आपल्या नजीकच्या शाखेशी संपर्क करून माहिती घ्या. बँकेचे नियम व योजना या सुरू किंवा बंद होत असतात.

Advertisement
कृषी योजना

View Comments

Recent Posts

शेतकऱ्यासाठी आनंदवार्ता, पाऊसाची चिंता संपली, यावेळी महाराष्ट्रात किती पाऊस पडणार, जाणून घ्या.

शेतकऱ्यासाठी आनंदवार्ता, पाऊसाची चिंता संपली, यावेळी महाराष्ट्रात किती पाऊस पडणार, जाणून घ्या. सूर्य संपूर्ण महाराष्ट्रात… Read More

2 weeks ago

ऊस पिकात झपाट्याने होतोय, ब्लॅक बग या रोगाचा प्रादुर्भाव, जाणून घ्या या रोगापासून उसाचे पीक कसे वाचवायचे.

ऊस पिकात झपाट्याने होतोय, ब्लॅक बग या रोगाचा प्रादुर्भाव, जाणून घ्या या रोगापासून उसाचे पीक… Read More

2 weeks ago

Kapus Bajar Bhav 2024: महाराष्ट्रातील आजचे कापसाचे बाजारभाव!

Kapus Bajar Bhav 2024: महाराष्ट्रातील आजचे कापसाचे बाजारभाव! Kapus Bajar Bhav : महाराष्ट्रातील कापसाचे बाजार… Read More

2 weeks ago

कापसाची नवीन जात, एकरी देते 14 क्विंटल पर्यंत उत्पादन, शेतकऱ्यांसाठी वरदान.

कापसाची नवीन जात, एकरी देते 14 क्विंटल पर्यंत उत्पादन, शेतकऱ्यांसाठी वरदान. जाणून घ्या कापसाची नवीन… Read More

2 weeks ago

ऊस व या पिकाच्या लागवडीसाठी मिळणार भरगोस अनुदान, महत्वपूर्ण निर्णय.

ऊस व या पिकाच्या लागवडीसाठी मिळणार भरगोस अनुदान, महत्वपूर्ण निर्णय. Substantial subsidy for cultivation of… Read More

2 weeks ago

जिरायत आणि नापीक जमिनीही होणार पूर्णतः बागायत, शेतकऱ्यांना करावे लागेल फक्त एवढं काम.

जिरायत आणि नापीक जमिनीही होणार पूर्णतः बागायत, शेतकऱ्यांना करावे लागेल फक्त एवढं काम. Farming Tips:… Read More

2 weeks ago

This website uses cookies.