Sbi Land purchase scheme in marathi | You can buy land even if you don’t have money Become a land owner through this scheme.
टीम कृषी योजना / krushi Yojana
देशाचे अर्थ गणित व जनतेच्या पोटाची भूक भागवते ती आपली काळी माती म्हणजेच शेती व शेतकरी. ग्रामीण भागाचा कणा असलेली शेती सर्वांकडेच असते असे नाही.काहींकडे कमी प्रमाणात असते तर काहींकडे नसते अशा वेळी ग्रामीण भागातील प्रत्येकाला स्वतःची शेतजमीन असावी त्यात आपले छोटेसे घर ,गोठा असावा असे स्वप्न असते.अनेक शेतकऱ्यांना शेतजमीन खरेदी करण्याची इच्छा असली तरी अनेकदा पैशाअभावी देखील त्यांना जमीन खरेदीसाठी मोठी अडचण निर्माण होत असते.
अशाच छोट्या शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेली स्टेट बैंक ऑफ इंडियाने एक महत्वपूर्ण योजना आणली आहे. ( Sbi Land purchase scheme )
यामुळे आपल्याकडे पैसे नसताना देखील शेत जमीन खरेदी करून शेतजमीनीचे मालक होता येणे शक्य झाले आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया ने आणलेल्या या योजनेला ‘जमीन खरेदी योजना’ असे नाव दिले असून बँकेच्या वेबसाईटवर याची सविस्तर माहितीही देण्यात आलेली आहे.
Sbi जमीन खरेदी योजनेचा उद्देश
SBI च्या जमीन खरेदी योजना (Sbi Land Purchase Scheme) या योजनेचा हेतू हा आहे की, लहान शेतकऱ्यांना जमीन खरेदी करण्यास मदत करणे. किंवा ज्यांच्याकडे शेतीयोग्य जमीन नाही अशा शेतकऱ्यांना शेतीयोग्य जमीन खरेदीसाठी मदत करणे. या योजनेचा लाभ घेताना महत्वाची अट ही आहे की अर्जदारावर दुसऱ्या कुठल्याही बँकेचे कर्ज नसावे.
1. जमीन खरेदी करण्यासाठी मिळेल कर्ज.
2. जमीन विकास, सिंचन विकास (या गोष्टींची किंमत जमिनीच्या एकूण ५० टक्के पेक्षा जास्त नसावी )
One Comment