Advertisement

Mukhyamantri Saur Krushi Pamp Yojana :मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2021 : किती अनुदान | काय आहे योजना | कुठे करायचा अर्ज

टीप : योजनेच्या संपूर्ण माहितीसाठी हा लेख पूर्ण वाचा.

Advertisement

Mukhyamantri Saur Krushi Pamp Yojana :मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2021 : किती अनुदान | काय आहे योजना | कुठे करायचा अर्ज. Mukhyamantri Saur Krushi Pamp Yojana: Mukhyamantri Solar Krishi Pump Yojana 2021: How Many Grants | What is the plan? Where to apply

टीम कृषी योजना / Krushi Yojana

Advertisement

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2021 Mukhyamantri Saur Krushi Pamp Yojana या योजनेंतर्गत पुढील तीन वर्षात एक लाख पंप बसविण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. जर आपणास या योजनेचा लाभ घ्यावयाचा असेल तर संपूर्ण माहिती वाचा. आवडल्यास इतर शेतकरी बांधवांना पाठवा.

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजने Mukhyamantri Saur Krushi Pamp Yojana अंतर्गत राज्य सरकार पंपाच्या किंमतीच्या एकूण ९५ टक्के अनुदान देते. लाभार्थ्या कडून फक्त ५ टक्के रक्कम घेतली जाईल. मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना २०२१ च्या माध्यमातून सौर पंप मिळाल्यास शेतकऱ्याचे उत्पन्नही वाढेल तसेच विजेची बचत होईल व पर्यावरण प्रदूषण होणार नाही. नैसर्गिक इंधनाची म्हणजेच पेट्रोल, डिझेल ची बचत होणार आहे आणि त्यांचा इंधनाला लागणार खर्च वाचेल. या दृष्टीने विचार करून राज्य सरकारने हि योजना राबवण्याचे ठरवले आहे. महाराष्ट्र सौर कृषी पंप योजना २०२१ मध्ये सरकारचा अतिरिक्त वीज भार कमी होणार आहे. जुने डिझेल पंप नवीन सौर पंपामध्ये बदलले जातील. त्यामुळे प्रदूषण हि रोखले जाईल. सिंचन क्षेत्रात विजेसाठी शासनाने दिले जाणारे अनुदान देखील कमी होईल. या सर्व गोष्टींचा विचार करून सदर योजना अमलात आणली आहे.

Advertisement

१. या योजनेंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी कृषी पंप उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
२. सौर कृषी पंप योजनेच्या पहिल्या टप्प्यात सरकार २५ हजार सौर जलपंपांचे वितरण करणार असून, दुसर्‍या टप्प्यात ५० हजार सौर पंपांचे वितरण करणार आहे.आणि तिसर्‍या टप्प्यात राज्य सरकार २५ हजार सौर पंपचे राज्यातील शेतकऱ्यांना वाटप करणार आहे.
३. ५ एकरपेक्षा कमी शेतजमिनी असलेल्या सर्व शेतकर्‍यांना ३ एचपी आणि त्या पेक्ष्या जास्त शेतजमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना ५ एचपी सौर पंप या योजनेअंतर्गत दिले जाणार आहेत.
४. ज्या शेतकऱ्यांकडे यापूर्वी वीज जोडणी आहे, त्यांना या योजनेंतर्गत सौर पंपचा लाभ दिला जाणार नाही.

मुख्यमंत्री सौर कृषि पंप योजने साठी पात्रता.

१. लाभ घेणारा शेतकरी महाराष्ट्र राज्यातील असला पाहिजे.
२. पाण्याचे स्रोत असलेले शेतकरी या योजनेंतर्गत लाभ घेण्यास पात्र आहेत. तथापि, पारंपारिक वीज जोडणी असणाऱ्या शेतक्यांना या योजनेतून सौरपंपाचा लाभ मिळणार नाही.
३. आदिवासी आणि दुर्गम भागातील शेतकरी जे पारंपारिक उर्जा म्हणजेच महावितरण कंपनीचे विद्युतीकरण करीत नाहीत . अशा प्रदेशातील शेतकरी या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतात.
४. जल स्रोतामध्ये नदी, विहीर, स्वत:ची आणि सार्वजनिक शेती तलाव इ. जल स्रोत म्हणून ग्राह्य धरले जातील.
५. ज्या खेड्यांमध्ये अद्याप वनविभागातील एनओसीमुळे शेतकरी विद्युतीकरण झाले नाहीत. अश्या भागातील शेतकरी या योजनेसाठी पात्र असणार आहेत.

Advertisement

महाराष्ट्र सौर कृषी पंप योजना २०२१ आवश्यक कागदपत्र

  • आधार कार्ड
  • ओळखपत्र
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • शेतातील कागदपत्रे
  • पत्ता पुरावा
  • मोबाइल नंबर
  • बँक खाते पासबुक

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना २०२१ योजनेचा अर्ज करण्याची पद्धत.

या योजनेंतर्गत आपल्या सोलर पंपद्वारे सिंचनासाठी सौर पंप लाभ घेण्यास पात्र आणि इच्छुक लाभार्त्यांनी या योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

 

Advertisement

लाभार्थ्यांची निवड व निकष

३ आणि ५ एचपी सौर पंप लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याकडे पारंपारिक वीज कनेक्शन असू नये.पाण्याचे निश्चित स्रोत असलेले शेतजमीन असावी.पूर्वी कुठल्याही योजनेतून विद्युतीकरण झालेले नसावे. ५ एकरांपर्यंत शेतजमीन असणारी ३ एचपी पंप पात्र आहे आणि ५ एकरांपेक्षा जास्त शेती जमीन ५ एचपी आणि ७.५ एचपी पंपसाठी पात्र आहे. देय प्रलंबित ग्राहक, कृषी पंपासाठी नवीन वीज जोडणीसाठी अर्ज केला.

दुर्गम व आदिवासी भागातील शेतकऱ्यांना विशेष प्राधान्य.

वनविभागातील एनओसीमुळे अद्याप वीज नसलेल्या खेड्यांमधील शेतकरी. “धडक सिंचन युवा” लाभार्थी शेतकरी यांना विशेष प्राधान्य दिले जाते.

Advertisement

७.५ एचपी पंपसाठी लाभार्थी निवडीचे निकषः

पाण्याचे स्रोत वि‍हिर किंवा  कुपनलिका  असणे आवश्यक आहे. पाण्याच्या स्त्रोताची खोली ६० मीटरपेक्षा जास्त नसावी. जीएसडीएने परिभाषित केलेल्या अति शोषित, शोषित आणि अंशतः शोषित गावांच्या अंतर्गत येणा विहिरी व ट्यूबवेलवर सौर पंप देण्यात येणार नाही. ६०% पेक्षा कमी विकास / उतारा घेण्याचे टप्पे असणाऱ्या सुरक्षित पाणलोट क्षेत्रातील गावांमध्ये येणा लाभार्थ्यांना सौर पंप देण्यात येईल.

 

Advertisement

प्रवर्गनिहाय लाभार्थी योगदान

१. सामान्य प्रवर्गातील लाभार्थी योगदान १० टक्के असणार आहे. त्यामध्ये ३ एचपी साठी लाभार्थी योगदान रु. १६५६०/- ,५ एचपी साठी रु.२४७१०-/ तर ७.५ एचपीसाठी लाभार्थी योगदान हे रु. ३३४५५/- एवढे असणार आहे.

२. अनुसूचित जाती (SC ) प्रवर्गासाठी लाभार्थी योगदान ५ टक्के असणार आहे. त्यामध्ये ३ एचपी साठी लाभार्थी योगदान रु. ८२८०/ – ,५ एचपी साठी रु.१२३५५-/ तर ७.५ एचपीसाठी लाभार्थी योगदान हे रु. १६७२८/- एवढे असणार आहे .
३. ST प्रवर्गासाठी लाभार्थी योगदान ५ टक्के असणार आहे. त्यामध्ये ३ एचपी साठी लाभार्थी योगदान रु. ८२८०/ – ,५ एचपी साठी रु. १२३५५-/ तर ७.५ एचपीसाठी लाभार्थी योगदान हे रु. १६७२८/- एवढे असणार आहे .

Advertisement

सदर योजनेची सविस्तर माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.आपणास ही माहिती आवडल्यास कृपया इतर शेतकरी बांधवांना नक्की पाठवा. व अशा विविध योजनांचा माहितीसाठी आपल्या कृषीयोजना डॉट कॉम या वेब साईट ला भेट देत जा. धन्यवाद.

Advertisement
कृषी योजना

View Comments

Recent Posts

शेतकऱ्यासाठी आनंदवार्ता, पाऊसाची चिंता संपली, यावेळी महाराष्ट्रात किती पाऊस पडणार, जाणून घ्या.

शेतकऱ्यासाठी आनंदवार्ता, पाऊसाची चिंता संपली, यावेळी महाराष्ट्रात किती पाऊस पडणार, जाणून घ्या. सूर्य संपूर्ण महाराष्ट्रात… Read More

2 weeks ago

ऊस पिकात झपाट्याने होतोय, ब्लॅक बग या रोगाचा प्रादुर्भाव, जाणून घ्या या रोगापासून उसाचे पीक कसे वाचवायचे.

ऊस पिकात झपाट्याने होतोय, ब्लॅक बग या रोगाचा प्रादुर्भाव, जाणून घ्या या रोगापासून उसाचे पीक… Read More

2 weeks ago

Kapus Bajar Bhav 2024: महाराष्ट्रातील आजचे कापसाचे बाजारभाव!

Kapus Bajar Bhav 2024: महाराष्ट्रातील आजचे कापसाचे बाजारभाव! Kapus Bajar Bhav : महाराष्ट्रातील कापसाचे बाजार… Read More

2 weeks ago

कापसाची नवीन जात, एकरी देते 14 क्विंटल पर्यंत उत्पादन, शेतकऱ्यांसाठी वरदान.

कापसाची नवीन जात, एकरी देते 14 क्विंटल पर्यंत उत्पादन, शेतकऱ्यांसाठी वरदान. जाणून घ्या कापसाची नवीन… Read More

2 weeks ago

ऊस व या पिकाच्या लागवडीसाठी मिळणार भरगोस अनुदान, महत्वपूर्ण निर्णय.

ऊस व या पिकाच्या लागवडीसाठी मिळणार भरगोस अनुदान, महत्वपूर्ण निर्णय. Substantial subsidy for cultivation of… Read More

2 weeks ago

जिरायत आणि नापीक जमिनीही होणार पूर्णतः बागायत, शेतकऱ्यांना करावे लागेल फक्त एवढं काम.

जिरायत आणि नापीक जमिनीही होणार पूर्णतः बागायत, शेतकऱ्यांना करावे लागेल फक्त एवढं काम. Farming Tips:… Read More

2 weeks ago

This website uses cookies.