टीम कृषी योजना :
प्रधानमंत्री किसान मानधन योजना या योजनेबद्दलची सर्व माहिती
आम्ही सर्वप्रथम आपल्यासोबत घेऊन आलो आहोत. या योजनेमध्ये जर आपणास लाभ घ्यायचा असेल तर मित्रांनो शेतकऱ्याच्या नावावर जास्तीतजास्त पाच एकर पर्यंत शेतजमीन असेल अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो.
कुणाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही
.?
ज्या शेतकऱ्यांच्या नावावर पाच एकरच्या वर जमीन आहे किंवा 5 एकर पर्यंत जमीन आहे परंतु तो नोकरीला आहे.
किंवा इन्कम टॅक्स रिटर्न भरतो अशा लोकांना या योजनेचा लाभ घेता येत नाही.
या योजनेसाठी वयोमर्यादा काय आहे..?
तर आपण बघणार आहोत की या योजनेसाठी वयोमर्यादा किती लागेल तर या योजनेसाठी शेतकरी बांधवांनो 18 ते 40 या वयोगटातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.
पेन्शन किती मिळणार व कधी मिळणार..?
वयाच्या साठ वर्षानंतर 3000 रु पेंशन मिळणार मध्ये आधी मृत्यू झाला किंवा वर्षाच्या अगोदर झाला तरी ही योजना त्यांच्या पत्नीला पुढे सुरू ठेवता येणार किंवा या योजनेतून बाहेरही पडता येणार बाहेर पडल्यानंतर जेवढे पैसे त्या शेतकऱ्यांने पैसे जमा झाले ते व्याजासहित पत्नीला मिळणार शेतकऱ्याच्या साठ वर्षानंतर मृत्यू झाला कमीत कमी तीन हजार रुपये आहे त्याच्या अर्धी पेन्शन म्हणजे पन्नास टक्के पंधराशे रुपये पेन्शन च्या पत्नीला मिळणार या योजनेतून कमीत कमी पाच वर्षानंतर बाहेर पडता येणार आहे. या बाबत अधिक माहितीसाठी तुमच्याजवळ सीएससी सेंटर म्हणजेच ग्राहक सेवा केंद्रांमध्ये जाऊन तुम्ही त्या ठिकाणी अधिक माहिती घेऊ शकता आणि तुम्हाला जर या योजनांमध्ये सहभाग घ्यायचा असेल किंवा रजिस्ट्रेशन करायचे असेल तर तुम्ही सीएससी सेंटर मध्ये जाऊन ऑनलाईन अर्ज सुद्धा करू शकता.