टीम कृषी योजना
मागील काही दिवस महाराष्ट्रासाठी अत्यंत कठीण होते राज्य मोठ्या संकटास तोंड देत आहे, एकीकडे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना राज्यावर तौत्के या चक्रीवादळाचं संकट आलं होतं. या वादळात राज्यातील कोकणासह अनेक जिल्ह्यात प्रचंड नुकसान झाले.
या संकटाचा महाराष्ट्राने धैर्याने सामना केला व करत आहे, तसेच तौत्के चक्रीवादळाचे अद्याप पंचनामे सुरू आहेत तोच राज्यात मान्सूनची चाहूल लागली आहे. मान्सुन अंंदमान मध्ये दाखल झाला आहे.
अंदमान निकोबार बेटावर मान्सून दाखल
21 मे रोजी अंदमान आणि निकोबार बेटावर मान्सून दाखल होणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला असून काल तिथे मान्सूननं हजेरी लावली आहे.तसेच पुढील 8 दिवसांत म्हणजेच दरवर्षी प्रमाणे 1 जून रोजी केरळात मान्सूनचं आगमन होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आलं आहे.
महाराष्ट्र राज्यातही पावसाची शक्यता
पुढील 3 ते 4 दिवसांत मध्य महाराष्ट्रासह घाट भागात काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, सोमवारी आणि मंगळवारी पुणे, सातारा, नाशिक आणि कोल्हापूर जिल्ह्यात पावसाला सुरुवात होणार असून 10 जूनला मान्सून राज्यात दाखल होणार आहे.
Monsoon 2021 KrushiYojana