Soybean Prices: सोयाबीन बाजारभावात पुन्हा मोठी तेजी, लातूर बाजार समितीत मिळाला सर्वाधिक बाजारभाव.
Soyabin bajar Bhav Today: Todays Soybean Prices
राज्यात बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात वाढलेले सोयाबीन दर नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत खाली आले होते, गेल्या आठवड्याभरापासून सोयाबीनच्या दरात घसरण होत असताना,आज सोयाबीनच्या दरात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.राज्यातील लातूर बाजार समितीमध्ये आज सर्वाधिक दर मिळाला आहे.
सोयाबीनच्या भावाचा आलेख यावेळी वर-खाली होत आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीच्या दिवसात सोयाबीनच्या दराने विक्रम मोडले होते, तर नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात पुन्हा सोयाबीनच्या दरात घसरण झाली. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सोयाबीनचा भाव सात हजार रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचला होता, तर तिसऱ्या आठवड्यात सोयाबीनच्या भावात अचानक घसरण होऊन कमाल भाव पाच हजार दोनशे रुपये प्रतिक्विंटलपर्यंत मर्यादित राहिले. सलग ५ दिवस सोयाबीनच्या घसरणीनंतर आज पुन्हा सोयाबीनमध्ये वाढ झाली आहे, लातूर बाजार समिती मध्ये आज सर्व बाजार समित्यांमधील सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे.
Soybean Market Prices: सोयाबीनचा बाजार झपाट्याने वाढत आहेत, लातूर मार्केटमध्ये ६२७१ वर पोहोचला, आज लातूर कृषी उत्पन्न बाजारात सोयाबीनला ६२७१ रुपये दर मिळाला तर किमान भाव ५२०० रुपये प्रति क्विंटल आणि कमाल भाव ५८०० रुपये प्रति क्विंटल होता. दर्जासह सोयाबीनची किंमत पाहिली तर फुले संगम व इतर काही दर्जाच्या सोयाबीनची किमान किंमत ५२०० रुपये आणि कमाल भाव ५८५१ रुपये प्रति क्विंटल आहे, तर इतर बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची किंमत ४,४००-६,००० रुपये प्रति क्विंटल आहे. आज या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला राज्यातील सर्वाधिक बाजारभाव मिळणाऱ्या मार्केटचे सोयाबीन दर सांगत आहोत.
त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व बाजार समित्यांचे सोयाबीन,कांदा,कापूस व इतर शेतीमालाचे बाजारभाव आणि शेतकऱ्यांशी संबंधित सर्व प्रकारची माहिती मिळविण्यासाठी दररोज आमच्यासोबत रहा.
1 thought on “Soybean Prices: सोयाबीन बाजारभावात पुन्हा मोठी तेजी, लातूर बाजार समितीत मिळाला सर्वाधिक बाजारभाव.”