Google News

आमचे ताजे अपडेट्स Google News वर वाचा

कांदा साठवणुकीची नवी पद्धत ; दोन वर्षे टिकतो कांदा | ‘या’ शेतकऱ्याने सांगितली नवीन पद्धत

 

टीम कृषी योजना / Krushi Yojana

दरवर्षी शेतात काबाडकष्ट करून शेती करून देखील शाश्वत उत्पन्न मिळेल याची खात्री नसते,कांदा पीक घेणारे अनेक शेतकरी आहेत,प्रामुख्याने महाराष्ट्रात कांदा पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते,पिकवलेला कांदा पारंपरिक पद्धतीने साठवून दरवाढ झाल्यावर विक्री करून अधिक पैसा मिळवला जातो परंतु शेड मध्ये,कांदा चाळीत कांदा किती दिवस टिकेल हे कांद्याच्या प्रतवारी व वातावरणावर अवलंबून असते.
पारंपरिक पद्धतीने केल्या गेलेल्या या शेतीमुळे, पिकाची साठवण यामुळे शेतकऱ्याला अनेक वेळेस तोटा होतो.परंतु शेतीत विविध प्रयोग करणारे अनेक शेतकरी आपण बघतो,वेगळ्या प्रयोगाने हे शेतकरी नक्कीच यशस्वी होत असतात. आज आपण अश्याच एका आधुनिकतेची कास धरून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती बघणार आहोत.

ही महत्वाची माहिती नक्की पहा – शेती पीक कर्जात मोठी वाढ | तुमच्या पिकाला किती पीक कर्ज मिळणार | Crop loan New rates | वाचा सविस्तर

शेतकरी कांदाचाळी मध्ये कांदा साठवतात. शासनाकडून कांदा चाळी साठी अनुदान दिलं जातं.
परंतु ‘ या ‘पद्धतीने कांदा साठवल्याने कांदा खराब होण्याचे प्रमाणही अधिक आहे.
परंतु यावर एका शेतकऱ्याने नवीन उपाय शोधला आहे.यामुळे शेतकरी आपला कांदा अधिक दिवस टिकवून ठेऊ शकतात. ( New method of onion storage; Onion lasts for two years The new method, said the farmer )

दोन वर्षे कांदा टिकवण्याची पद्धत ( Method of preserving onion for two years ) शोधून काढणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे सुमेर सिंग. सुमेर हे हरियाणा मधील भिवानीतील ढाणी माहूत येथे वास्तव करतात.
कांदा साठवणुकीसाठी त्यांनी शेतकऱ्याना कमी खर्चात व कांदा जास्तीत जास्त महिने टिकेल असा उपाय सांगितला आहे.

काय आहे कांदा साठवणुकीचे नवे तंत्रज्ञान

सुमेर सिंग या शेतकऱ्याकडे शेतात एक शेड आहे. यामध्ये त्यांनी कांदे कापडी दोरीने बांधून ठेवले आहेत. सुमेर सिंग सांगतात की “कांदा विक्रीसाठी पोत्यात भरून पोते एकावर एक ठेवले जातात. कांदे उष्ण असल्यामुळे दाब वाढून कांदे खराब होत असतात. एक जरी कांदा खराब झाला तर इतर कांदेही खराब होऊ लागतात.
परंतु या पद्धवतीने कांदा साठवल्याने खराब होण्याचे प्रमाण अतिशय कमी झाले आहे.

शेतकरी सुमेर सिंग यांनी शेतात सेंद्रीय पद्धतीने कांद्यांचं उत्पादन घेतलं असून सेंद्रिय पद्धतीने कांदा अधिक टिकतो असे ते सांगतात.

महत्वाची बातमी – कांद्याच्या भावात वाढ होण्याची शक्यता ; या कारणामुळे होऊ शकते वाढ

कांदाकाढल्या वर शेतकरी सुमेर यांनी कांदे पातीसह एकत्र करून बांधले. ते कांदे शेतातील शेडमध्ये दोरीने टांगून ठेवले आहेत. जसा लसूण शेड मध्ये लटकून ठेवला जातो. या पद्धतीच्या वापराने कांदा टिकतो खराब होत नाही.

शेती करत असताना “सेंद्रीय शेती , रासायनिक शेती दोन्ही प्रकारात जोखीम असते. म्हणून शेतकऱ्यांनी नवीन प्रयोग करायचेच नाहीत का.? सर्व शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेती चा प्रयोग करावा.असे शेतकरी सुमेर सिंग यांनी सांगितले.

योजनेची माहिती नक्की पहा – कांदा चाळ अनुदान योजना 2021 | योजनेची संपूर्ण माहिती व मार्गदर्शन

Leave a Reply

Don`t copy text!