टीम कृषी योजना / Krushi Yojana
नैऋत्य मोसमी पावसाने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात हजेरी लावली आहे. शेतक-यांना खरिप हंगामातील पिक पेरणीचे वेध लागल्याने शेतक-यांची बी-बियाणे, खते, शेतीसाठी लागणाऱ्या औजारांची जुळवा जूळव करणे सुरू केले आहे.
बियाणे खरेदी करताना घ्यायची काळजी.?
पेरणीसाठी बियाणे खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाने आवाहन केले आहे की शेतक-यांनी बियाणे खरेदी करतांना खात्री करुनच बियाणे खरेदी करावी. मुख्यमंत्र्यांच्या ‘विकेल ते पिकेल’ या संकल्पनेला अनुसरून खरिपाचे नियोजन करण्याच्या सूचना कृषीमंत्री भुसे यांनी राज्यातील कृषी विभागाला दिल्या आहेत. यासाठी पोक्राच्या वतीने प्रायोगिक तत्त्वावर तालुकानिहाय कृषी हवामान सल्ला सेवा सुरू करण्यात येत आहे. कृषी विज्ञान केंद्रांच्या साहाय्याने ही सेवा देण्यात येणार असल्याचे समजते.
या खरिपाच्या हंगामात बी-बियाणे, खते, किटक नाशक या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची उलाढाल होत असते.या संधीचा फायदा घेत अनेकजण याचा आर्थिक फायदा घेण्याच्या उद्देशाने बाजारात बोगस बियाणे विक्री करतात.यातून शेतकऱ्यांचे बियाणांचे,मशागतीचे पैसे व श्रम वाया जातात. कमी दरात बियाणे मिळतात म्हणून खरेदी न करता शेतक-यांनी खात्री करुनच बियाणांची खरेदी केली पाहिजे. खरेदी केल्यानंतर संबधीत दुकानदारांकडून पक्केबिल घ्यावे, असे आवाहन कृषि विभागाकडून शेतक-यांना करण्यात आले आहे.