टीम कृषी योजना/ krushi yojana
विक्री, पेरणी व उत्पादन करण्यास बंदी असलेल्या एचटीबीटी हर्बिसाइड-टोलरेंट बीटी या कापूस बियाण्यांची विक्री करणारे रॅकेट औरंगाबाद जिल्ह्यात सक्रिय झाले आहे. गुजरात व आंध्रप्रदेशा मधून चोरून लपून आणले जाणाऱ्या या बियाणांच्या खरेदीतून शेतकऱ्यांच्या फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहेत.
आंध्रप्रदेश ,गुजरात, मध्यप्रदेश या राज्यांच्या सीमेवरील जिल्ह्यात एचटीबीटी बियाण्यांची लागवड मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे अधिकृत कपाशी बियाणे विक्रीवर याचा मोठा परिणाम होत आहे.
कृषी विभागा कडून एचटीबीटीचे २५ बियाण्यांचे पॅकेट जप्त केले असून संबंधित विक्रेता पसार झाला आहे. तो गुजरातच्या कृषी उत्पादक कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे समजते. बहुतांश बोगस साठा गुजरात व उत्तरप्रदेश मधून येत आहे.