Google News

आमचे ताजे अपडेट्स Google News वर वाचा

‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार दूध काढणी यंत्र ; जिल्हा परिषदची योजना | ५० टक्के अनुदान.

 

टीम कृषी योजना / Krushi Yojana

जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे जिल्ह्यातील पशुपालक शेतकऱ्यांना जनावरांचे दूध काढण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या यंत्राचे निम्मे अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती पशुसंवर्धन व कृषी सभापती अनिल मोटे यांनी दिली.(Jilha parishad Shetkari Yojana)
जिल्हा परिषदेच्या कृषी समितीची बैठक आयोजित केली आहे. कृषी विभाग मार्फत शेतकरी वैयक्तिक लाभ योजनेसाठी 3.5 साडेतीन कोटी इतका निधी असून.
बहुतांश निधी जनावरांच्या लसीकरण व बियाणासाठी वापरला जातो. मागीलवर्षी कोरोना महामारीमुळे कृषी विभागाच्या योजना राबवल्या नाहीत.(Zp Sheti Yojana)

५० टक्के अनुदानावर अवजारे व साहित्य वाटप करण्यात येईल. नावीन्यपूर्ण योजना घेण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागात पशुपालकांची संख्या वाढत असून. जनावरांचे दूध काढण्यासाठी आधुनिक यंत्रे बाजारात आहेत. या यंत्रांची किमत ३२ हजार रुपयांपासून आहे. जिल्हा परिषदे ( Zp Krushi Yojana ) मार्फत २८ हजार रुपयांचे साहित्य खरेदी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यातील अर्धी किमत म्हणजे १४ हजार रुपये अनुदान जिल्हा परिषद देणार आहे. याहुन अधिक किमतीचे साहित्य असेल,फरक रक्कम लाभार्थ्याला द्यावी लागेल.

शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर वापर वाढत आहे. कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांनीही २० ते ३० एचपी क्षमतेचे ट्रॅक्टर घेतले आहेत. या शेतकऱ्यांना सिंगल तसेच डबल पलटी नांगर , रोटावेअर व पेरणीयंत्र खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे.

‘कृषी केंद्रासाठी आवश्यक परवाना ‘, व अनेक योजना राज्य कृषी विभागाकडे आहेत. आता फक्त झेडपीच्या सेस फंडातील तरतुदी बोटावर मोजता येतील इतक्याच योजना सुरू असून पशुसंवर्धन विभाग केवळ लसीकरणासाठी चर्चेत आहे.

Leave a Reply

Don`t copy text!