टीम कृषी योजना/krushi yojana
नैऋत्य मोसमी पाऊसाचे आगमन झाले आहे,राज्यभर कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. शेतकऱ्यांची शेती कामाची लगबग सुरू झाली असून,कपाशी,सोयाबीन याच बरोबर तुरीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते आज आपण तुरीची लागवड कधी,कशी करावी व बीजप्रक्रिया,बियाणांची निवड या बाबत जाणून घेऊयात.
खालील माहिती व बातम्या नक्की वाचा
या कारणामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, नाही तर होईल ….
विक्री,उत्पादन व पेरणी करण्यास बंदी असणारे कापसाचे बोगस बियाणे बाजारात.
पैसे नसले तरीही जमीन खरेदी करू शकता | या योजनेद्वारे व्हा जमिनीचे मालक.
चांगल्या प्रमाणात पाऊस झाल्यानंतर जमिनीत वाफसा येताच जून महिन्याचा दुसरा आठवडा ते जुलैचा महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पेरणी पूर्ण करावी. उशिरा लागवड केल्यास लवकर पेरलेल्या पिकाबरोबर फुले येतात आणि त्याच्या कायिक वाढीस पुरेसा अवधी मिळत नाही. त्यामुळे पिकाची वाढ कमी होऊन फांद्या कमी येतात. तसेच फुले आणि शेंगांची संख्याही कमी राहते आणि उत्पादनात घट येते.
आय.सी.पी.एल.-८७ या लवकर तयार होणाऱ्या जातीची ४५ x १० सें.मी. अंतरावर लागवड करावी. मध्यम कालावधीतील जातींची ६० x २० सेंमी किंवा ९० x २० सें.मी. अंतरावर लागवड करावी.
बियाणांचे प्रमाण काय ठेवावे –
आय.सी.पी.एल.-८७ जातीच्या पेरणीसाठी एकरी ७ ते ८ किलो बियाणे लागते. मध्यम कालावधीच्या राजेश्वरी, विपुला आणि बी.डी.एन.-७११ या जातींचे एकरी ५ ते ६ किलो बियाणे पुरसे आहे. उशिरा येणाऱ्या आणि जास्त अंतरावरील जातींसाठी एकरी २ ते २.५ किलो बियाणे टोकण पद्धतीने लावावे.
बीजप्रक्रिया काय करावी –
प्रति किलो बियाण्यास ५ ग्रॅम ट्रायकोडर्माची बीजप्रक्रिया करावी. त्यानंतर २५० ग्रॅम रायझोबियम व पी.एस.बी. जिवाणू संवर्धन प्रति १० किलो बियाण्यास गुळाच्या थंड द्रावणातून प्रक्रिया करावी.
वरील माहिती आवडल्यास इतर शेतकरी बांधवांना नक्की पाठवा.इतर कुठलीही माहिती हवी असल्यास आम्हास कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा.