कोरोनाच्या संकटानंतर लॉकडाऊन उघडल्याने हळू हळू विविध व्यवसाय पूर्वपदावर येत आहेत.नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील कांदा मार्केट गेल्या चार पाच वर्षापासून खुली लिलाव पद्धत ,विक्री पश्चात त्वरित पेमेंट यामुळे नेवासा तालुक्यासह जिल्हाभरातुन व गंगापूर ,वैजापूर, कन्नड,बीड ,औरंगाबाद,पैठण यांसह राज्यभरातून घोडेगाव येथे कांद्याची आवक होते उच्च प्रतीचा कांदा माल व योग्य व्यवस्थापन यामुळे देशभरातून कांदा खरीदीदार घोडेगाव कांदा मार्केट येथे कांदा खरेदीसाठी येतात व प्राधान्य देतात त्यामुळे कांदयास नेहमी चांगला भाव मिळतो त्यामुळे शेतकरी बांधवांत नेहमी समाधानाचे वातावरण असते.नुकतेच लॉकडाऊन उठल्यानंतर घोडेगाव कांदा मार्केटला आवक मोठ्या प्रमाणावर होत आहे.मंगळवार दि 13 जुलै 2021 रोजी घोडेगाव ता नेवासा येथील कांदा मार्केटला राज्यातील सर्वाधिक विक्रमी 560 ट्रक (99482 गोणी) कांदा आवक एकाच दिवशी झाली ही आवक राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा मार्केटपेक्षा सर्वाधिक अशी होती.यात सुमारे 8 ते 9 कोटी रुपयांपर्यत आर्थिक उलाढाल झाली.( This onion market in Ahmednagar district has the highest number of onions in the state.)
उन्हाळी कांद्यास प्रति क्विंटल
मोठा माल – 1700-1800
मध्यम मोठा – 1600-1700
मध्यम माल – 1500-1600
गोल्टा/गोल्टी – 700-1400
1/2 वक्वल -1850-2000
प्रमाणे भाव मिळाला.चांगला भाव मिळाल्याने शेतकरी बांधवांनी समाधान व्यक्त केले.पुढेही कांदा भावात वाढ होईल अशी शक्यता कांदा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.
मा ना शंकररावजी गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली घोडेगाव ता नेवासा येथे सुरू असलेल्या कांदा मार्केटमुळे घोडेगाव व परिसरातील अर्थकारणाला मोठी गती मिळाली आहे छोटे मोठे हॉटेल व्यवसायिक,दुकानदार,कांदा बारदाना विक्रेते,हमाल,ट्रक चालक,टेम्पो चालक आदींना रोजगार उपलब्ध झाला आहे.
या पूर्वीचे सर्व रेकॉर्ड घोडेगाव कांदा मार्केटनेच मोडले असून,एक दिवसात राज्यात सर्वाधिक कांदा आवक होणारे घोडेगावचे कांदा मार्केट आता देशभरात प्रसिध्द होत आहे.