टीम कृषी योजना / Krushi Yojana
यंदाच्या वर्षी कापूस पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे,कापसाला या वर्षी 7000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळण्याची शक्यता आहे.(Cotton is expected to fetch Rs 7,000 per quintal this year.)
मागील वर्षी कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले गेले होते,कोरोना ,लॉकडाऊन व बाहेर देशातून घटलेली मागणी यामुळे कापसाला 5500 रुपयाच्या दरम्यान भाव मिळाला होता.
भाव वाढण्याची काय असतील कारणे.?
मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी 14 टक्के इतकी पेरणी कमी झालेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजार पेठेत यावर्षी कापसाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे.शासकीय नियमानुसार 6500 हमीभाव असून यापेक्षा अधिक भाव मिळेल असा अंदाज आहे.
कापसाच्या उत्पन्नातून मालाची गुणवत्ता चांगल्या दर्जाची असेली व निसर्गाची साथ मिळाल्यास यावर्षी कापसाला 7000 प्रती क्विंटल इतका भाव मिळण्याची शक्यता आहे. स्वदेशी जिनिंग असोसिएशनचे चे संचालक प्रदीप जैन यांनी या बाबतची शक्यता वर्तवली आहे.
मागिल वर्षी परतीच्या पावसामुळे राज्यात विविध भागात कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे कापसाला भाव मिळाला नाही.
परंतु यावर्षी कापसास मागील वर्षीच्या तुलनेत अधिकचा भाव मिळण्याची शक्यता आहे कारण या वर्षी कापसाच्या लागवडीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे.
वरील माहिती आपणास आवडल्यास अथवा उपयुक्त वाटल्यास इतर शेतकरी बांधवांना पाठवा,फेसबुक,व्हॉट्सअप ग्रुप वर शेअर करा.
1 thought on “यंदा कापसाला 7000 प्रति क्विंटल भाव मिळण्याची शक्यता .”