टीम कृषी योजना / Krushi Yojana
कांद्याच्या दरात आज अनेक महिन्या नंतर मोठी तेजी पहावयास मिळाली आहे. उन्हाळी कांदा Onion Price त्याच बरोबर लाल कांदा कमी प्रमाणात बाजारात दाखल होत असून,बुधवार दिनांक 22 सप्टेंबर 2021 रोजी घाऊक बाजारात कांद्याच्या किमतीत मोठी तेजी झाली.पारदर्शक व्यापार व रोख कांदा पट्टी यामुळे महाराष्ट्रात अल्पावधीतच प्रसिद्ध झालेल्या व या कांदा हंगामात अनेकदा राज्यातील सर्वाधिक कांदा आवक असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील Onion Market Ghodegaon घोडेगाव – नेवासा कृषी उत्पन्न बाजार समिती येथे बुधवारी कांद्याचे भाव 800 ते 1000 रुपयांनी वाढून 2700 रुपये प्रति क्विंटल झाले. त्याचा परिणाम किरकोळ किमतींही वाढणार आहेत. 7 महिन्यांच्या नंतर कांदा उच्चांकावर पोहोचला असून कांदा भाव वाढीचे शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे.
टीम कृषी योजना ने गेल्या आठवड्यात 15 सप्टेंबर रोजी कांदा भाव वाढण्याची शक्यता वर्तविली होती ,त्यात आम्ही सांगितले होते की येत्या काही दिवसात कांदा 30 रुपये प्रति किलोच्या वर ठोक विक्री होणार असून शेतकऱ्यांनी आपला कांदा या अनुमानाद्वारे विक्री करावा. टीम कृषी योजनाने सांगितल्या प्रमाणेच कांद्याच्या भावात आज तेजी पहावयास मिळाली असून घाऊक बाजारात आज 800 पासून 1000 रुपयांपर्यंत बाजार भाव वाढले.
काय आहेत भाव वाढीची कारणे..?
कांद्याचे भाव वाढण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे पावसाळा आहे, ज्यामुळे कांद्याचे नवीन पीक विलंबाने होत आहे.अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यात नवीन कांदा पिकाचे नुकसान झाले आहे,
त्याचबरोबर, ताऊटे चक्रीवादळामुळे, कांद्याच्या बफर स्टॉकचा कालावधी देखील कमी करण्यात आला आहे, ज्यामुळे किमतींवरही परिणाम होत आहे.या वर्षी वर्ष-दर-वर्षाच्या आधारावर खरीप 2020 च्या तुलनेत 15 टक्क्यांनी कमी कांद्याचे उत्पादनाचा अंदाज आहे.
मान्सूनचा थेट परिणाम कांद्याच्या किमतीवर दिसून येत आहे. सर्वप्रथम, ऑगस्टमध्ये मान्सून चांगला नव्हता म्हणजे पाऊस खूप कमी होता. आता सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे या समस्या भेडसावत आहेत.मान्सूनचा कांद्याच्या उत्पादनावर परिणाम झाला असून यामुळे खरीप कांद्याचे भाव वाढत आहेत.
दुग्ध उद्योजक विकास योजना:Dairy Entrepreneur Development Plan डेअरी उघडण्यासाठी नाबार्डकडून स्वस्त कर्ज उपलब्ध होईल
———————————————————-
गेल्या अनेक महिन्यांपासून कांद्याच्या कमी झालेल्या भावामुळे शेतकऱ्यांची घोर निराशा झाली होती,कांदा चाळीत साठवलेल्या कांद्यास मोठा खर्च करून देखील भाव वाढला नव्हता आता भाव वाढ होत असल्याने शेतकऱ्यांना याचा आर्थिक लाभ होऊ शकतो. येत्या काही दिवसांत कांदा अधिक महाग होऊ शकतो, अशी अपेक्षा आहे. कांद्याचे दर वाढण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे पावसाळा हे आहे, ज्यामुळे कांद्याचे पीक विलंबाने होत आहे.
महाराष्ट्रातील ठोक बाजार समिती मधून घेतलेल्या अहवालानुसार आज कांदा भावात आठशे ते एक हजार रुपयांपर्यंत तेजी पहावयास मिळाली.
सोळाशे ते सतराशे रुपयांपर्यंत विक्री होणारा कांदा आज बुधवार रोजी दोन हजार पाचशे ते दोन हजार सातशे रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला आहे,ही भाव वाढ अशीच सुरू राहण्याची शक्यता असून ,कांदा कितीचा टप्पा गाठतो याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या असून, कांदा चाळीत कांदा शिल्लक असणाऱ्या शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.
आज निघालेले कांदा बाजार भाव
कृषी उत्पन्न बाजार समिती घोडेगाव, नेवासा
दि: 20/09/2021
वार – बुधवार
शाखा-घोडेगाव
एकुण कांदा आवक – ( 45977) गोणी
कांदा गोणी वजन क्विंटल ( 26206/69)
उन्हाळी माल (चांगले माल)
मोठा माल – 2100-2200
मध्यम मोठा – 1800-1900
मध्यम माल – 1500-1600
गोल्टा/गोल्टी – 1100-1500
जोड 500/600
भारी माल वक्वल -2500 – 2700