Google News

आमचे ताजे अपडेट्स Google News वर वाचा

Well subsidy scheme : शेतकऱ्यांसाठी विहीर अनुदान योजना, महाराष्ट्र सरकारची महत्वकांक्षी योजना, असा घ्या लाभ.

Well subsidy scheme : शेतकऱ्यांसाठी विहीर अनुदान योजना, महाराष्ट्र सरकारची महत्वकांक्षी योजना, असा घ्या लाभ.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी शेतीसाठी सिंचन ही मोठी समस्या आहे. अनेक शेतकऱ्यांकडे स्वतःची विहीर नाहीये व विहीर नसल्याने त्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. यावर उपाय म्हणून महाराष्ट्र राज्य सरकारने विहीर अनुदान योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी मोठी आर्थिक मदत दिली जाते आहे, आज आपण विहीर अनुदान योजनेसंदर्भात माहिती जाणून घेऊयात.

विहीर अनुदान योजनेचा लाभ कोणाला मिळतो

ही योजना प्रामुख्याने लहान व मध्यम शेतकऱ्यांसाठी आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय शेतकऱ्यांना या योजनेत विशेष प्राधान्य दिले जाते. तसेच कोरडवाहू शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही योजना खूप उपयुक्त आहे.

Vihir Yojana: विहिरी खोदण्यासाठी सरकार शेतकऱ्यांना 4 लाख रुपये देत आहे, असा अर्ज करा आणि लाभ घ्या

 

विहीर अनुदान किती मिळते

महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांना ५० ते १०० टक्के अनुदान देते. काही ठिकाणी शेतकऱ्यांना पूर्णतः मोफत विहीर बांधून दिली जाते. मराठवाड्यात व राज्यातील काही भागात संपूर्ण १०० टक्के अनुदान सरकार देत आहे, हे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होते किंवा शासन मान्यताप्राप्त विहीर खोदणी सेवा पुरवठादारांकडून काम करून घेतले जाते.

विहीर योजनेसाठी अर्ज कसा करावा

शेतकऱ्यांना ऑनलाईन किंवा स्थानिक कृषी विभाग कार्यालयात अर्ज करता येतो. अर्जासाठी लागणारी कागदपत्रे –

  1. ७/१२ आणि ८ अ उतारा
  2. आधार कार्ड
  3. बँक खाते माहिती
  4. जातीचा दाखला (आरक्षित प्रवर्गासाठी)
  5. शेतात विहीर खोदण्यासाठी लागणारी जागेची माहिती

विहीर योजनेचे शेतकऱ्यांसाठी फायदे

  • शेतकऱ्यांना स्वखर्चाने विहीर खोदण्याची गरज नाही
  • उन्हाळ्यातही शेतीसाठी पाणी उपलब्ध होते
  • ठिबक व तुषार सिंचनासाठी पाण्याचा पुरेसा साठा मिळतो
  • सिंचन व्यवस्थापन सुधारल्याने पीक उत्पादन वाढते
  • शेतकऱ्यांचा पाण्यासाठी होणारा खर्च व श्रम कमी होतात

लवकर अर्ज करा आणि विहिरीसाठी अनुदान मिळवा

शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी जवळच्या कृषी विभागाच्या कार्यालयात किंवा महा-ई-सेवा केंद्रावर संपर्क साधावा. विहीर खोदणी योजनेमुळे शेतकऱ्यांना कायमस्वरूपी पाणी उपलब्ध होईल आणि त्यांची शेती अधिक समृद्ध बनेल.

Leave a Reply

Don`t copy text!