Tomato Farming: टोमॅटोचे भाव घसरले; शेतकऱ्यांना मोठा फटका, का घसरत आहेत दर,पहा
Tomato Farming: टोमॅटोचे भाव घसरले; शेतकऱ्यांना मोठा फटका, का घसरत आहेत दर,पहा Tomato Farming: Tomato prices fall; Big hit to farmers, why prices are falling, see
गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोच्या भावात मोठी घसरण झाल्याने शेतकऱ्यांना आपला माल रस्त्यावर फेकून द्यावा लागत आहे. बाजार समितीत टोमॅटोचा भाव दोन ते चार रुपये किलो असल्याने उत्पादन खर्च काढणेही कठीण झाले आहे. त्यामुळे टोमॅटोचा लालसरपणा कमी झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याने त्याचा सर्वाधिक फटका उत्पादकांना बसला आहे. टोमॅटो हे जास्त उत्पादन देणारे पीक असल्याने तालुक्यात त्याची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. टोमॅटोलाही गेल्या महिन्यात चांगला भाव मिळाला होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोचे दर खाली आले आहेत.