आजचे सोयाबीन बाजार भाव; महाराष्ट्र राज्यातील प्रमुख बाजार समितीचे सोयाबीन बाजारभाव
आजचे सोयाबीन बाजार भाव; महाराष्ट्र राज्यातील प्रमुख बाजार समितीचे सोयाबीन बाजारभाव. Today’s soybean market price; Soybean Market Price of Major Market Committee in Maharashtra State
नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण महाराष्ट्र राज्यातील काही प्रमुख बाजार समिती मधील सोयाबीनचा बाजारभाव बघणार आहोत राज्यात बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक थोड्या प्रमाणात सुरू झालेली आहे. बाजार समित्यांमध्ये एक महिन्याभरामध्ये आवक मोठ्या प्रमाणात येईल परंतु सध्या आवक कमी जरी असली तरी भाव स्थिर आहेत. अनेक तज्ज्ञांचा अहवाल आहे की येत्या काळामध्ये सोयाबीनचा भाव हा 7000 रुपयांपर्यंत जाऊ शकतो त्यामागे रशिया आणि युक्रेन युद्धाचा देखील परिणाम होणार आहे कारण युक्रेन मध्ये सोयाबीनची पेरणी कमी झालेली आहे, अमेरिकेत देखील पावसामुळे सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. भारतात देखील यंदा सोयाबीनचे उत्पादन काही प्रमाणात घटणार आहे यामुळे येत्या काळामध्ये सोयाबीन उत्पादकांना चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा आहे.