पीक विमा निकषामध्ये बदल करून शेतकऱ्यांना भरपाई देण्याचा राज्य सरकारचा निर्णय

Advertisement

 

टीम कृषी योजना / Krushi Yojana

Advertisement

फळ पीक वीमा योजनेत विमा कंपन्यांनी जाचक अटी लागू केल्या होत्या. यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले होते. नवीन नियम बदलून जुनेच निकष लावण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. राज्यामधील आघाडी सरकारने केंद्राकडे बोट दाखवत हात वर केले होते.

विमा कंपनीच्या जाचक अटींमुळे राज्यातील अनेक शेतकरी पीक विमा पासून वंचित आहेत. गेल्या वर्षीचे पीक विमा काढूनही अनेक शेतकऱ्यांची नावे लाभार्थ्यांमध्ये आलीच नाहीत. पिकांचं नुकसान होऊनही भरपाई मिळाली नाही. अनेकदा कृषी विभाग, तसेच सरकारी कार्यालयात खेटा मारूनही शेतकऱ्यांच्या पदरी घोर निराशाच मिळाली परंतु आता राज्य सरकारला उपरती झाली असून, शेतकऱ्यांच हित बघता राज्य सरकारने पीक विमा निकषामध्ये बदल करून शेतकऱ्यांना भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. ( State Government’s decision to compensate farmers by changing crop insurance norms )

Advertisement

या मुळे हजारो लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार असून ,केळी पिका सोबतच संत्री, मोसंबी, द्राक्षे, पेरू, डाळिंब, सीताफळ, पपई, लिंबू, आंबा, काजू ह्या फळपिकांना फायदा होईल.

पीक विम्याचे निकष हे आहेत…

नवीन निकषानुसार 1 नोव्हेंबर ते 28 फेब्रुवारी या काळात तापमान सलग तीन दिवस 8 डिग्री सेल्सियसच्या खाली राहिल्यास शेतकऱ्यांना 26 हजार 500 रुपयांपर्यंत नुकसान भरपाई विमा कंपन्यांना शेतकऱ्यांना द्यावी लागणार आहे.
1 एप्रिल ते 30 एप्रिल या काळात सलग पाच दिवस तापमान 42 डिग्री सेल्सिअस च्या पुढे राहिल्यास शेतकऱ्यांना 43 हजार 500 रुपये विमा संरक्षण मिळेल.

Advertisement

1 मार्च ते 31 जुलै दरम्यान 40 किमी पेक्षा अधिक हवा राहिल्यास शेतकऱ्यांना 70 हजार रुपये भरपाई मिळेल. 1 जानेवारी ते 30 एप्रिल दरम्यान गारपीट झाल्यास 43 हजार 500 रुपये असे एकूण 1 लाख 86 हजार 667 रुपयांचे विमा संरक्षण शेतकऱ्यांना मिळेल. वारा आणि गारपीट ची माहिती शेतकऱ्यांनी तातडीने विमा कंपनीला कळवणे आवश्यक आहे.

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

please disable Adblock to proceed to the destination page