Google News

आमचे ताजे अपडेट्स Google News वर वाचा

या कांदा मार्केटला प्रचंड आवक ,वाहनांच्या लागल्या 4 किलोमीटर पर्यंत रांगा.

या कांदा मार्केटला प्रचंड आवक ,वाहनांच्या लागल्या 4 किलोमीटर पर्यंत रांगा. This onion market has a huge influx of onions, queues of vehicles up to 4 kilometers.

अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात असणाऱ्या घोडेगाव कांदा मार्केट ला मंगळवार दिनांक 13 सप्टेंबर रोजी प्रचंड प्रमाणात कांदा आवक झाली ,मार्केट गेट पासून वाहनांच्या 3 ते 4 किलोमीटर पर्यंत लांबच लांब रांगा लागल्या होत्या,सोमवारी झालेल्या मार्केटला 550 ट्रक कांदा विक्रीसाठी आला होता,प्रचंड आवक व वाहनांच्या लागलेल्या रांगांचे व्हिडीओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले,आज बुधवारी होणाऱ्या लिलावात 500 हुन अधिक ट्रक कांदा विक्रीस येईल असा अंदाज आहे.

घोडेगाव मार्केटला मंगळवारी कांदा आवक घेऊन येणाऱ्या वाहनांच्या 3 ते 4 किलोमीटर पर्यंत रांग लागली होती.

सोमवारी झालेल्या कांदा लिलावात 1800 पर्यंत भाव निघाले होते , अहमदनगर जिल्हा व जिल्ह्या बाहेरून कांदा घोडेगाव मार्केट मध्ये कांदा विक्रीसाठी येत आहे,राज्यात या घोडेगाव मार्केटचे झालेले नाव व रोख कांदा पट्टी यामुळे हे मार्केट नावाजले आहे.बीड,औरंगाबाद,जालना,वैजापूर,गंगापूर,पैठण,कन्नड, नगर,राहुरी,पाथर्डी यासह अनेक जिल्ह्यातून व तालुक्यातून घोडेगाव मार्केटला कांदा विक्रीसाठी येत आहे.

सोमवारी झालेली 550 ट्रक कांदा आवक व त्यामुळे व्यापाऱ्यांकडे सोमवारच्या लिलावतील कांदा दुकानात शिल्लक राहिल्याने ,व्यापाऱ्यांकडे माल खाली करण्यासाठी जागा उरली नाही सर्व शेड भरले होते.वाहन चालकांना बराच वेळ वाहने खाली करण्यासाठी थांबावे लागले.

मार्केट कमिटीच्या अधिकारी व सोनई पोलीस स्टेशनचे वाहतूक पोलीस यांनी आपल्या सहकाऱ्यांसह गर्दीचे नियोजन केले, त्यामुळे लवकरात लवकर मालवाहतूक गाड्यातील कांदा उतरवून घेता आला.

1700 ते 1800 रुपयांपर्यंत भारी कांद्याचे भाव निघाले ,मोठ्या भारी मालास 1450 ते 1650 रुपयांपर्यंत भाव निघाले ,हलका कांदा 200 ते 400 रुपये ,गोल्टी 450 ते 800 ,गोल्टा 600 ते 1000 रुपयांपर्यंत भाव मिळाला.

 

“उन्हाळी कांदा मोठ्या प्रमाणात खराब होत आहे,अधिक पाऊस यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कांदा विक्री सुरू केली आहे,शेतकऱ्यांनी एकाच वेळी कांदा विक्रीस आणण्यापेक्षा, प्रतवारी करून टप्या टप्याने कांदा विक्री साठी आणावा ,खराब कांदा चांगल्या मालात एकत्र आणू नये यामुळे शेतकऱ्यांना भाव कमी मिळून नुकसान होते,आमदार शंकरराव गडाख यांच्या सूचनेनुसार शेतकऱ्यांना योग्य भाव व रोख कांदा पट्टी देण्यासाठी आम्ही सर्व व्यापारी कटिबद्ध आहोत.

सतीश ढाकणे – कांदा आडतदार व ऑर्डर सप्लायर – घोडेगाव

 

Leave a Reply

Don`t copy text!