Onion Price: या मार्केटला एक दिवसात 93 हजार कांदा गोण्यांची आवक; भाव देखील सर्वाधिक
अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती नेवासाच्या घोडेगाव कांदा(Ghodegaon Onion Market) मार्केटचे नाव अल्पावधीत राज्यात प्रसिद्ध झाले आहे. घोडेगाव उपआवारामध्ये शनिवार दिनांक 15 ऑक्टोबर रोजी 502 ट्रक इतकी विक्रमी कांदा आवक होऊन 5 कोटी रुपयांची उलाढाल झाली.
नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील कांदा मार्केट मध्ये खुली लिलाव पद्धत ,विक्री पश्चात त्वरित पेमेंट यामुळे नेवासा तालुक्यासह जिल्हाभरातुन व गंगापूर ,वैजापूर, कन्नड,बीड ,औरंगाबाद,पैठण यांसह राज्यभरातून घोडेगाव येथे कांद्याची आवक होते उच्च प्रतीचा कांदा माल व योग्य व्यवस्थापन यामुळे देशभरातून कांदा खरीदीदार घोडेगाव कांदा मार्केट येथे कांदा खरेदीसाठी येत असतात व घोडेगाव मार्केटला प्राधान्य देतात यामुळे शेतकरी बांधवांत नेहमी समाधानाचे वातावरण असते.
उन्हाळी कांदा टिकत नसल्याने व दर्जा खालावत असल्याने शेतकरी कांदा विक्रीस प्राधान्य देत असल्याने आवक मोठ्या प्रमाणावर होत आहे.
शेजारील राज्यासह महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे नवीन कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, उन्हाळी कांद्यास मागणी वाढत असल्याकारणाने दरवाढ होत आहे.
शनिवार रोजी मार्केट मध्ये 93146 कांदा गोणी आवक झाली ,4 कोटी 50 लाख रुपयांचे पट्टी वाटप झाले तर 502 ट्रक कांदा विक्री साठी आला होता ,ट्रक टेम्पो ,ट्रॅक्टरची मोठी गर्दी झाली होती. विक्रमी आवक असून देखील अवघ्या 4 तासात संपूर्ण पट्टी वाटप पूर्ण झाले.
देशात दक्षिण भागातील राज्यामध्ये कांद्याचे पीक अधिक होते परंतु पावसामुळे महाराष्ट्रासह, शेजारील राज्यात कांद्याचे नुकसान झाले आहे,महाराष्ट्रात गावरान कांदा आजही अधिक प्रमाणात आहे, अधिक पाऊस तसेच कांदा खराब होण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा विक्री साठी आणत आहेत.
आ.शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शना खाली काम करत असलेल्या घोडेगाव कांदा मार्केट चे नाव देशात होत असून,देशातील मुख्य 10 कांदा मार्केट मध्ये घोडेगाव मार्केट चे भाव पाहून पुढील लिलाव होत असल्याने राज्यभरातील व्यापारी या ठिकाणी खरेदी साठी येत आहेत.
लिलावात कांद्यास मिळालेले दर Onion Price
फुल गोळा माल — 2300 2400
मध्यम मोठा – 2200 – 2300
मध्यम माल 2000- 2100
गोल्टी- 1000 – 1300
गोल्टा -1300 — 1800
जोड कांदा व बदला माल – 300 – 800
बदला माल – 1000 – 1600
हलका माल 100 – 500
अपवादात्मक भाव — 2600 — 2700
Onion Price,Onion Rates