Pune-Aurangabad Expressway: अखेर ठरलं..! असा असेल नवीन पुणे-औरंगाबाद महामार्ग, या गावातून जाणार रस्ता, भूसंपादनास होणार सुरुवात.

कोणत्या गावातून जाणार रस्ता जाणून घ्या, नवीन माहिती

Advertisement

Pune-Aurangabad Expressway: अखेर ठरलं..! असा असेल नवीन पुणे-औरंगाबाद महामार्ग, या गावातून जाणार रस्ता, भूसंपादनास होणार सुरुवात. Pune-Aurangabad Expressway: Finally decided..! This will be the new Pune-Aurangabad highway, the road passing through this village, land acquisition will begin.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा विशेष प्रोजेक्ट असलेला पुणे औरंगाबाद द्रुतगती महामार्ग हा महाराष्ट्रातील प्रमुख राष्ट्रीय महामार्गांपैकी एक आहे. हा महामार्ग भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) च्या माध्यमातून बांधला जाणार आहे,या महामार्गाची लांबी 225 किमी असून.पुणे, औरंगाबाद व अहमदनगर या जिल्ह्याच्या विकासामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण अशी भूमिका बजावणारा असा हा महामार्ग असणार आहे.

Advertisement

सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे हा ग्रीनफिल्ड एक्स्प्रेसवे केंद्र सरकारच्या भारतमाला या योजनेतून विकसित करण्यात येत आहे. या प्रकल्पासाठीचा डीपीआर अद्याप निश्चित केलेला नाही.
हा महामार्ग तीन जिल्ह्यातील कोणत्या कोणत्या गावातून जाणार आहे व कुठल्या गावातून जमीन संपादित केली जाणार आहे, याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.

पुणे औरंगाबाद महामार्गाचे स्वरूप काय आहे?

पुणे औरंगाबाद द्रुतगती महामार्ग हा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या समृद्धी महामार्गाला जोडला जाणार आहे, या महामार्गामुळे औरंगाबाद ते पुणे प्रवासाचा दरम्यानचा वेळ पाच तासांवरून अवघ्या दोन तासांवर येणार आहे. हा महामार्ग तयार करण्यासाठी दहा हजार कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित असून महामार्गाची लांबी 225 किमी इतकी आहे. हा महामार्ग सहा पदरी महामार्ग असून त्याची रुंदी 70 मीटर असेल.

Advertisement

सध्या आवश्यक असणारी जमीन भूसंपादन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या पुणे औरंगाबाद महामार्गाची सुरुवात ही पुण्याच्या रिंगरोडपासून असेल व औरंगाबादच्या शेंद्रा एमआयडीसी मधील समृद्धी महामार्गाला तो जोडला जाईल. या महामार्गावर प्रवेश करण्यासाठी दोन प्रवेशद्वार असणार आहेत, एक रांजणगाव येथे आणि दुसरा बिडकीन मध्ये.

Advertisement

या महामार्गावर प्रवेश करण्यासाठी दोनच ठिकाणावरून प्रवेश करता येईल. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील 17 व औरंगाबाद मधील 24 गावांतुन हा महामार्ग जाणार असून, त्यासाठी आवश्यक असणारी भूसंपादनाची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे काढन्यात आलेल्या रेखांकनानुसार जमीन मोजमाप प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील या गावांमधून जाणार महामार्ग.

1- औरंगाबाद तालुका- सुंदरवाडी, जलता, आडगाव बायक, चिंचोली, घडदोन, हिरापूर

Advertisement

2- पैठण तालुका – वरवंडी खुर्द, पारगाव, डोणगाव, बालानगर, कापुवारी, वरुडबिक, वावा, वडाळा, पाचलगाव, नारायणगाव, करंजखेडा, आखतवाडा, वाघरी, दादेगाव जहांगीर, पाटेगाव, सायगाव, पैठणी म.का.

अहमदनगर जिल्हा

1- शेवगाव तालुका – खडके, मडके, चापडगाव, वरखेड, हसनपूर, मुर्शतपूर, प्रभू वडगाव, सोमठाणे व डोंगर आखेगाव

Advertisement

2- श्रीगोंदा तालुका – हिंगणी दुमला, देव पैठण व वाकरेवाडी

3- पारनेर तालुका – पाडळी रांजणगाव, बाबुर्डी, कडूस, रुई छत्रपती, पिंपरी गवळी, रायताळे, सारोळा कासार व आष्टी गाव

Advertisement

4- नगर तालुका – उक्कडगाव, दगडवाडी, मराठवाडी, भातोडी पारगाव, दशमी गाव आणि बाबुर्डी घुमट

5- पाथर्डी तालुका – प्रभू पिंपरी, सैदापूर, दगडवाडी, तिसगाव, काथुंगे, देवराई आणि शिरापूर

Advertisement

पुणे जिल्हा

1- भोर तालुका – वरवे बुद्रुक, शिवरे, कासुर्डी जिल्हा, कासुर्डी गु. एमएससी मौजे कांजळी

2- हवेली तालुका – तरडे, वलटी, आळंदी महतोबाची, शिंदवणे, सोरतापवाडी, हिंगणगाव, भवरपूर आणि कोरेगाव मूल

Advertisement

3- पुरंदर तालुका – कोडीत खुर्द, वरवडी, थापेवाडी, गराडे, चांबळी, सासवड, पवारवाडी, हिवरे, दिवे, सोनोरी व काळेवाडी

4- दौंड तालुका-मिरवाडी

Advertisement

5- शिरूर तालुका – गोळेगाव, चव्हाणवाडी, देवकरवाडी, पिलनवाडी, पाटेठाण, तेलवारी, वडगाव बांडे, राहू, टाकळी व पानवली, उरळगाव, सातकरवाडी, दहिवडी, अंबाडे, कोरडे, बाबुलसर खुर्द, रांजणगाव गणपती व कारेगाव.

वरील माहिती आपणास कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा, ही माहिती इतर शेतकरी बांधवा पर्यंत नक्की शेअर करा.

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

please disable Adblock to proceed to the destination page