दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना 2022: आता शेती विकत घेण्यासाठी मिळणार अनुदान | PDF अर्ज आणि संपूर्ण माहिती, जाणून घ्या.

Advertisement

दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना 2022: आता शेती विकत घेण्यासाठी मिळणार अनुदान | PDF अर्ज आणि संपूर्ण माहिती, जाणून घ्या. Dadasaheb Gaikwad Empowerment Yojana 2022: Subsidy to buy farm now | PDF application form and complete information, know.

Alpbhudharak Shetkari Yojana 2022

Advertisement

Dadasaheb Gaikwad Yojana form | Dadasaheb gaikwad sabalikaran yojana 2022 | दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना 2022 | Alpabhudharak Shetkari Yojana 2022 | अल्पभूधारक शेतकरी योजना २०२२

केंद्र व राज्यसरकरच्या वतीने शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी विविध योजना राबविल्या जात असतात. ज्या शेतकऱ्यांकडे स्वतःची जमीन नाही, किंवा जे शेतकरी अल्पभूधारक आहेत अश्या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र राज्यसरकारकडून शेतजमीन खरेदी अनुदान योजना राबण्यात येत आहे. आज आपण या लेखात या योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेऊ.

Advertisement

महाराष्ट्र शरद पवार ग्रामीण समृध्दी योजना 2021: ऑनलाईन नोंदणी | संपूर्ण माहिती |

राज्यसरकरकडून कर्मवीर दादासाहेब गायकवाड;(Dadasaheb Gaikwad Sablikaran Yojana ) सबलीकरण योजना 2022 नुसार अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील अल्पभूधारक शेतकन्यांना राज्यशासनाकडून जमिन खरेदी करण्यासाठी 50 % बिनव्याजी कर्ज स्वरूपात व 50 टक्के अनुदान स्वरूपात रक्कम दिली जाते. आज आपण या लेखातून कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना (Karmaveer Dadasaheb Gaikwad Sablikaran Yojana) विषयीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. योजनेचा उद्देश, लाभार्थी, अर्जाची संपूर्ण प्रक्रिया व योजनेसाठी आवश्यक असणारे कागदपत्रे. योजनेबाबत पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आपण हा लेख शेवटपर्यंत पहा.

Advertisement

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना 2022

Karmaveer Dadasaheb Gaikwad Sablikaran Yojana 2022

महाराष्ट्र राज्यात वास्तव्यास असणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील व्यक्तींच्या हाताला काम मिळावे,त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी म्हणून भूमिहीन शेतमजूर,शेतकरी यांच्यासाठी महाराष्ट्र सरकारने कर्मवीर दादासाहेब गायकवाड (Dadasaheb gaikwad sablikaran Yojana) स्वाभिमान योजना व दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना 2022 राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisement

या योजनेअंतर्गत अल्पभूधारक शेतकरी,भूमिहीन शेतमजूर यांच्यासाठी शासनाकडून शेतजमीन खरेदी करून ती भूमिहीन अनुसूचित जाती प्रवर्गातील कुटुंबांतील पती अथवा पत्नीच्या नावे केली जाते. या योजनेत विधवा व परित्यक्त्या स्त्रियांच्या बाबतीत जमीन त्यांच्या नावे केली जाते.

अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील दारिद्र्यरेषेखाली असणाऱ्या भूमिहीन शेतमजूर,शेतकरी कुटूंबास चार एकर कोरडवाहू जमीन किंवा अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन शेतमजूर,शेतकरी कुटूंबास चार एकर कोरडवाहू जमीन किंवा दोन एकर बागायती जमीन उपलब्ध करून दिली जाते .या योजनेत जमीन खरेदी करण्यासाठी येणाऱ्या एकूण खर्चापैकी 50 % रक्कम बिनव्याजी कर्ज स्वरूपात व 50 % रक्कम अनुदान स्वरूपात महाराष्ट्र राज्य सरकार देते.

Advertisement

दादासाहेब गायकवाड भूमिहीन योजना 2022 च्या अटी

दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना 2022 ( Dadasaheb Gaikwad Sablikaran Yojana 2022 ) चा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांचे किमान वय हे 18 वर्ष व कमाल वय हे 60 वर्ष ईतके निश्चित केले आहे.

दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेत अर्ज करणाऱ्या अर्जदाराकडे जमीन नसावी तसेच तो दारिद्र्यरेषेखालील शेतमजूर असावा, योजनेसाठी परित्यक्ता, विधवा स्त्री यांना या योजनेत प्राधान्य देण्यात येईल.

Advertisement

महसूल व वन विभागाने ज्यां शेतमजूर अथवा शेतकऱ्यांना गायरान व सिलिंगच्या जमिनीचे वाटप केले गेले आहे, त्या शेतकरी कुटुंबांस दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना ( Dadasaheb Gaikwad Sablikaran Yojana 2022 ) चा लाभ मिळणार नाही,किंवा यापूर्वी लाभ घेतलेल्या संबंधित कुटुंबास कुठल्याही कारणास्तव जमीन इतर व्यक्तीना हस्तांतरीत अथवा विक्री करता येणार नाही.

दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेतील लाभार्थ्यास दिले जाणारे कर्ज हे बिनव्याजी असेल व त्या कर्जाची मुदत ही 10 वर्षे असणार आहे.

Advertisement

घेतलेल्या कर्जाच्या कर्जफेडीची सुरुवात ही कर्ज मंजुरीच्या दोन वर्षांनंतर सुरू होईल.लाभार्थी कुटूंबाने 10 वर्षाच्या कालावधीत कर्जाची परतफेड करणे आवश्यक आहे.

योजनेतील लाभार्थी शेतकरी,शेतकमजुरांनी जमीन स्वतः कसणे आवश्यक असून तसा करारनामा देणे बंधनकारक आहे.

Advertisement

लाभार्थ्यासाठी जमीन खरेदी करत असताना तीन लाख रूपये प्रती एकर एवढ्या कमाल मर्यादेत खरेदी करण्याची मुभा हि जिल्हास्तरीय समितीला देण्यात आलेली आहे.

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

अर्जदाराचा पासफोर्ट आकाराचा फोटो

Advertisement

अर्जदाराने अनुसूचित जाती प्रवर्गातील असल्याबाबतचे उपविभागीय अधिकारी यांनी दिलेले जातीचे विहीत प्रमाणपत्र, रहिवाशी दाखला, रेशन कार्डची झेरॉक्स, आधार कार्डची झेरॉक्स, निवडणूक ओळखपत्र व भूमिहीन असल्याबाबतचा तहसीलदार यांनी निर्गमित केलेला दाखला.

तसेच तहसीलदार यांनी दिलेला मागील वर्षाचा उत्पन्नाचा दाखला.

Advertisement

अर्जदारचे वय हे 60 वर्षाच्या खाली असेल तर त्यास वायकग पुरावा बंधनकारक आहे.त्यात शाळा सोडल्याचा दाखला ज्यावर अर्जदाराची जन्म तारीख स्पष्ट दिसत असावी.

अर्जदार हा दारिद्र्यरेषेखालील असल्याबाबतचे सत्य प्रमाणपत्र

Advertisement

शेतजमीन पसंतीबाबत लाभाथ्र्यांचे 100 रूपयाच्या स्टॅम्प पेपरवरील प्रतिज्ञापत्र.

Dada Saheb Gaikwad Sablikaran Yojana Application Form PDF

Advertisement

 

आमच्या शेतकरी बांधवांनो आपणास जर कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना 2022 (Karmaveer Dadasaheb Gaikwad Sablikaran Yojana 2022 ) साठी अर्ज करायचा असेल तर तो ऑफलाइन पद्धतीने करावा लागेल,करण राज्यसरकार कडून अद्याप दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झालेली नाही.

Advertisement

ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून Karmaveer Dadasaheb Gaikwad Sablikaran Yojana pdf अर्ज डाऊनलोड करू शकता, व संबंधित सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालया मध्ये हा अर्ज विहित नमुन्यात सादर करावा लागेल.

शेतकरी वाचक मित्रांनो, आपणास दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना 2022 तसेच अल्पभूधारक शेतकरी योजना 2022 बाबत कुठलीही अडचण असेल तर खालील कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा, माहिती आवडल्यास इतरांना शेअर करा.

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

please disable Adblock to proceed to the destination page