Advertisement
Categories: KrushiYojana

शेतातील यांत्रिकीकरण उपकरणे खरेदी करण्यासाठी अनुदान होणार जमा, हजारो शेतकऱ्यांची लागणार लॉटरी, तुम्हाला मिळेल का लाभ, जाणून घ्या.

Advertisement

शेतातील यांत्रिकीकरण उपकरणे खरेदी करण्यासाठी अनुदान होणार जमा, हजारो शेतकऱ्यांची लागणार लॉटरी, तुम्हाला मिळेल का लाभ, जाणून घ्या. Subsidy to be collected to buy farm mechanization equipment, lottery for thousands of farmers, know whether you will get benefit.

विविध कृषी यांत्रिकीकरण योजनांसाठी अर्ज केलेल्या राज्यभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात येत्या दोन महिन्यांत सुमारे 200 कोटी रुपये जमा होण्याची शक्यता आहे. त्यासाठी कृषी आयुक्तालय युद्धपातळीवर नियोजन करत आहे.
केंद्र सरकारच्या कृषी यांत्रिकीकरण उपअभियान तसेच राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सध्या यंत्रसामग्री आणि उपकरणांसाठी अनुदान दिले जाते. याशिवाय राज्य सरकारेही यांत्रिकीकरणासाठी स्वतंत्र योजना राबवत आहेत.
सध्या कृषी विभागाकडून राज्यातील यांत्रिकीकरण अनुदानाचा दररोज आढावा घेतला जात आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये योग्य नियोजन केल्यास 31 मार्चअखेर राज्यभरात 200 कोटी रुपयांपर्यंतचा निधी वितरित होण्याची शक्यता आहे. याचा फायदा किमान 30,000 शेतकऱ्यांना होईल.

Advertisement

राज्य सरकारच्या लॉटरीत नामांकन झालेल्या शेतकऱ्यांनी विविध अवजारे व यंत्रे खरेदी केल्यानंतर हे अनुदान दिले जाते. गेल्या तीन आठवड्यात 121 कोटी रुपये अनुदानासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यापैकी 101 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. यामध्ये कृषी यांत्रिकीकरण उपअभियानातून 52 कोटी रुपये, राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून 42.84 कोटी रुपये आणि राज्य सरकारच्या यांत्रिकीकरण योजनेतून 27 कोटी रुपयांचा समावेश आहे.

या वर्षी आतापर्यंत केंद्र आणि राज्य सरकारने यांत्रिकीकरण योजनांमध्ये सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना 498 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यापैकी 421 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. कृषी विभागाच्या इतर योजनांच्या तुलनेत यावेळी यांत्रिकीकरणाच्या योजना वेगाने सुरू आहेत. लॉटरीत नाव असलेल्या लाभार्थ्यांना वेळेवर अनुदान वाटप झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याचा दावा कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.

Advertisement

राज्यातील कृषी यांत्रिकीकरण वाढणार

यांत्रिकीकरणासाठी देशात सर्वाधिक अनुदानाचे वितरण महाराष्ट्र राज्य करत आहे. यामुळे राज्यातील कृषी यंत्रसामग्री वाढणार असल्याचे कृषी विभागातील सूत्रांनी सांगितले. 2019 च्या सर्वेक्षणानुसार, राज्याची यांत्रिकी क्षमता 1.449 किलोवॅट प्रति हेक्टर होती. अजून नवीन सर्वेक्षण झालेले नाही. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, पण 2024 च्या अखेरीस या रकमेत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे.

Advertisement
Krushi Yojana

Recent Posts

शेतकऱ्यासाठी आनंदवार्ता, पाऊसाची चिंता संपली, यावेळी महाराष्ट्रात किती पाऊस पडणार, जाणून घ्या.

शेतकऱ्यासाठी आनंदवार्ता, पाऊसाची चिंता संपली, यावेळी महाराष्ट्रात किती पाऊस पडणार, जाणून घ्या. सूर्य संपूर्ण महाराष्ट्रात… Read More

4 weeks ago

ऊस पिकात झपाट्याने होतोय, ब्लॅक बग या रोगाचा प्रादुर्भाव, जाणून घ्या या रोगापासून उसाचे पीक कसे वाचवायचे.

ऊस पिकात झपाट्याने होतोय, ब्लॅक बग या रोगाचा प्रादुर्भाव, जाणून घ्या या रोगापासून उसाचे पीक… Read More

4 weeks ago

Kapus Bajar Bhav 2024: महाराष्ट्रातील आजचे कापसाचे बाजारभाव!

Kapus Bajar Bhav 2024: महाराष्ट्रातील आजचे कापसाचे बाजारभाव! Kapus Bajar Bhav : महाराष्ट्रातील कापसाचे बाजार… Read More

4 weeks ago

कापसाची नवीन जात, एकरी देते 14 क्विंटल पर्यंत उत्पादन, शेतकऱ्यांसाठी वरदान.

कापसाची नवीन जात, एकरी देते 14 क्विंटल पर्यंत उत्पादन, शेतकऱ्यांसाठी वरदान. जाणून घ्या कापसाची नवीन… Read More

4 weeks ago

ऊस व या पिकाच्या लागवडीसाठी मिळणार भरगोस अनुदान, महत्वपूर्ण निर्णय.

ऊस व या पिकाच्या लागवडीसाठी मिळणार भरगोस अनुदान, महत्वपूर्ण निर्णय. Substantial subsidy for cultivation of… Read More

4 weeks ago

जिरायत आणि नापीक जमिनीही होणार पूर्णतः बागायत, शेतकऱ्यांना करावे लागेल फक्त एवढं काम.

जिरायत आणि नापीक जमिनीही होणार पूर्णतः बागायत, शेतकऱ्यांना करावे लागेल फक्त एवढं काम. Farming Tips:… Read More

4 weeks ago

This website uses cookies.