Soybean Prices : सोयाबीनच्या दरात मोठी तेजी, आज बाजार समित्यांत सोयाबीनची विक्री कोणत्या दराने झाली, पहा.
सोयाबीन बाजारभावांची माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत पहा.
Soybean Prices :पाच दिवसांच्या थोड्याश्या मंदीनंतर सोयाबीनच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे,या आठवड्यात बाजारात सोयाबीन कुठल्या दराने विकले जाणार,बाजारभाव किती वाढणार यासाठी ही महत्वाची माहिती पूर्ण पहा. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी व व्यापाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सोयाबीनचे दरात Soybean Market Prices वाढ होत आहे, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात वाढ झाली आहे. याचा फायदा देशातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार आहे, देशातील बाजार समित्यांमध्ये काहीशी तेजी दिसून येत आहे. टप्या टप्याने सोयाबीनचे दर पुन्हा वाढत आहेत,येत्या काळात चांगली दरवाढ होऊन एक महत्वाचा टप्पा सोयाबीन गाठेल असा तज्ञांचा अंदाज आहे.
सोयाबीन तेजी मंदी माहिती
आंतरराष्ट्रीय बाजार पेठेत सोयाबीनची मागणी वाढल्याने सोयाबीनचे दर वाढत आहेत.सोयाबीन काढणी सुरू झाल्यावर दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांनी सोयाबीन बाजारात विक्रीसाठी आणले होते, कारण शेतकऱ्यांना दिवाळी व पुढील शेतीकामासाठी पैशांची आवश्यकता होती. दिवाळीनंतर सोयाबीनची विक्री कमी झाली,शेतकऱ्यांनी दरवाढीच्या अपेक्षेने सोयाबीन साठवायला सुरु केले. या स्थितीत राज्यातील व देशातील बाजार पेठेत सोयाबीनच्या मागणीत वाढ होत आहे. बाजार पेठेत आवक कमी असल्यामुळे सोयाबीनच्या दरात वाढ होत आहे.याचे दुसरे कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर सोयाबीनचे भाव गगनाला भिडले आहेत, त्याच बरोबर केंद्र सरकारने सोयाबीन साठ्यावरील मर्यादा हटवली आहे,केंद्राच्या या निर्णयामुळे सोयाबीनला बाजाराला नवीन चालना मिळाली. आता आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचे दर वाढले आहेत.चीन मध्ये लॉकडाऊन मध्ये शिथिलता येऊन उद्योग सुरू झाल्याने सोयाबीनची मागणी वाढ होत आहे.
किती वाढले सोयाबीनचे दर
देशातील बाजारात सोयाबीनचा दर दररोज 100 ते 200 रुपयांपर्यंत वाढत आहे. सध्या सोयाबीनचा दर 5 हजार 400 ते 6300 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. त्याचवेळी मध्यप्रदेश, महाराष्ट्रातील बाजार समित्यांमध्ये बियाणे दर्जाच्या सोयाबीन मालाचे दर 5500 ते 7500 रुपयांपर्यंत गेले आहेत.होत असलेल्या या दरवाढीचा शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.
बाजारात सोयाबीन कोणत्या दराने विकले जाते ते पहा
सोयाबीनचे बाजारभाव हमीभावापेक्षा अधिक आहेत,यंदा सोयाबीनचा हमीभाव 4350 रुपये आहे, जालना बाजार समितीत दररोज सरासरी 15 हजार ते 22 हजार क्विंटल सोयाबीनची आवक होत आहे. हमीभावापेक्षा बाजारभाव अधिक असल्याने नाफेडने जिल्ह्यामध्ये मूग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी अद्याप एकही केंद्र सुरू केले नाही. सोयाबीनचा आधारभूत किमतीच्या पुढे म्हणजे 5000 ते 6500 रुपयांपर्यंत विक्री होत आहे.
One Comment