Google News

आमचे ताजे अपडेट्स Google News वर वाचा

Soybean Market : सोयाबीन शेतकऱ्यांना करणार मालामाल, येत्या आठवड्यात मोठी दरवाढ होण्याच्या हालचाली.

Soybean Market : सोयाबीन शेतकऱ्यांना करणार मालामाल, येत्या आठवड्यात मोठी दरवाढ होण्याच्या हालचाली.

देशातील सोयाबीनचे दर वाढण्याची शक्यता आता निर्माण झाली. कारण चालू आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात मोठे चढ उतार राहीले.

देशातील सोयाबीनचे दर (Soybean Rate) वाढण्याची शक्यता आता निर्माण झाली. कारण चालू आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात मोठे चढ उतार राहीले.
पण सोयापेंडच्या दरात (Soyacake Rate) वाढ झाली होती. तर देशातील बाजारातही दरात काहीशी सुधारणा झाली. पुढील आठवड्यातही देशातील बाजारात सोयापेंडचे दर वाढू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
आंतरराष्ट्रीय बाजारात या आठवड्यात जवळपास सर्वच शेतीमालाच्या दरात तेजी मंदी पाहायला मिळाली. सोयाबीन, सोयातेल आणि सोयापेंडच्या दरात चढ उतार होते.

मंगळवारी म्हणजेच 3 जानेवारीला सोयाबीनचा बाजार (Soybean Market) 15.20 डाॅलर प्रतिबुशेल्सवर खुला झाला होता. रुपयात हा दर 4 हजार 626 रुपये प्रतिक्विंटल होतो. त्यानंतर दरात मोठी घट झाली.
गुरुवारी सोयाबीनने आठवड्यातील निच्चांकी 14.70 डाॅलरचा टप्पा गाठला. रुपयात सांगायचं झालं तर हा 4 हजार 474 रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर कमी झाला.
तर शुक्रवारी दरानं काहीशी उभारी घेत बाजार 14.92 डाॅलरवर म्हणजेच 4 हजार 535 रुपयांवर बंद झाला. मंगळवारच्या दराशी तुलना करता शुक्रवारी सोयाबी 91 रुपयाने कमी झाले होते.
मात्र या आठवड्यात सोयातेलाचे दर नरमले होते. खाद्यतेल बाजारातील नरमाईचा सोयातेलाच्या दरावरही परिणाम जाणवला.
मंगळवारी 65 सेंट प्रतिपाऊंडवर असणारे सोयातेलाचे दर शुक्रवारी 63.26 सेंटवर होते.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर काहीसे नरमले, मात्र सोयापेंडच्या दरात वाढ झाली. मंगळवारी सोयापेंडचे वायदे 465 डाॅलर प्रतिटनावर खुले झाले होते.
रुपयात हा दर 38 हजार 255 रुपये होतो. त्यानंतर मात्र दरात चढ उतार आले. गुरुवारी दर 460 डाॅलरवर घसरल्यानंतर पुन्हा वाढले.
शुक्रवारी आठवड्याचा बाजार बंद झाला तेव्हा दरानं मागील सहा महिन्यांतील उच्चांकी टप्पा गाठला. शुक्रवारी बाजार 477 डाॅलरवर बंद झाला.
म्हणजेच 39 हजार 242 रुपयांवर सोयापेंडचे वायदे बंद झाले. मागील आठवडाभरात सोयापेंडच्या दरात टनामागं जवळपास एक हजार रुपयांची सुधारणा झाली होती.

सोमवारी देशातील सोयाबीनची भावपातळी 5 हजार 300 ते 5 हजार 500 रुपये होती. त्यात काहीसे चढ उतार होत बुधवारी दर 5 हजार 400 ते 5 हजार 700 रुपयांवर पोचले होते. शनिवारीही हा दर कायम होता.
दरवाढीस पुरक स्थिती
सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर एका दरपातळीवर टिकून आहेत. मात्र सोयापेंडच्या दरात तेजी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयापेंडचे दर वाढल्याचा भारतीय सोयाबीनला थेट फायदा होतो, असा आजवरचा अनुभव आहे. दर वाढल्यानंतर देशातून सोयापेंड निर्यात वाढू शकते. त्यामुळं पुढील आठवड्यात सोयाबीन दरात आणखी 100 रुपयांची सुधारणा दिसू शकते, अशा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Don`t copy text!