Soybean Market Prices : येत्या आठवड्यात सोयाबीनच्या दरात होणार मोठी वाढ, तज्ञांचा अंदाज.

Advertisement

Soybean Market Prices : येत्या आठवड्यात सोयाबीनच्या दरात होणार मोठी वाढ, तज्ञांचा अंदाज.Soybean Market Prices : There will be a big increase in soybean prices in the coming weeks, experts predict.

येत्या आठवडाभरात सोयाबीनच्या दरात प्रति क्विंटलमागे सुमारे शंभर रुपयांची किंवा त्याहून अधिक वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सध्या सोयाबीनच्या बाजारभावात काही प्रमाणात घसरण झाली आहे.

Advertisement

परंतु शेतकरी लगेच आपला शेतमाल विक्री न करता टप्प्याटप्प्याने बाजारात आणत आहेत. या कारणाने बाजारपेठेत सोयाबीनची आवक कमी झाली आहे. त्याच प्रमाणे मलेशियात पामतेलाच्या दरामध्ये वाढ झाली आहे. यामुळे येत्या आठवडाभरात सोयाबीनच्या दरात वाढ होणे अपेक्षित आहे.

सध्याच्या हंगामामध्ये सोयाबीनची आवक होत आहे,सध्या बाजारात सोयाबीनच्या दरावर दबाव होता. समित्यांमध्ये आवक सुरू झाल्यावर पहिल्याच आठवड्यात सोयाबीनच्या दरात तब्बल 15 टक्क्यांहुन अधिक घसरण झाली आहे. राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये सोयाबीन चार हजार रुपये प्रतिक्विंटल दराने विकले गेले. यंदाचा सोयाबीनचा हमी भाव हा रु.4300 रुपये आहे. परंतु यानंतर शेतकऱ्यांनी आपला शेतमाल बाजारात विक्रीसाठी नेणे बंद केले किंवा कमी केले,शेतकऱ्यांनी साठवणूक करण्यावर भर दिला. त्यामुळेच घसरलेले दर तीनच आठवड्यात सोयाबीन 5,500 ते 6,000 रुपयांच्या आसपास परत आले. परंतु मागील काही दिवसांपासून सोयाबीनच्या बाजारभावात किरकोळ घसरण झाली आहे.

Advertisement

मलेशियात पाम तेलाचे दर 3 टक्क्यांनी वाढले आहेत. कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये सुरू असलेली घसरणही थांबली आहे. सोयाबीन पिळल्यानंतर मिळणारे सोयाबीन पेंड व सोयाबीन तेल तयार होते. सोयाबीनचे दर जागतिक व देशांतर्गत बाजारपेठेत या उत्पादनांना असणारी मागणी, त्यांच्या दराच्या पातळीवरून ठरवल्या जातात. सोयाबिन तेल व पाम तेल यांच्यात थेट स्पर्धा आहे. या परिस्थितीत पामतेलाचे बाजारभाव वाढल्यास याचा थेट फायदा हा सोयाबीन दरात होणार आहे.

परंतु, सोयाबीनच्या निर्यातीत अधिकचा उत्साह नसल्याचे तज्ञ सांगित आहेत. मागील काही दिवसांपूर्वी सोयाबीनच्या दरात होत असलेल्या सुधारणांमुळे निर्यातीबाबत अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यावेळी निर्यातीसंदर्भातील करार झाला होता. परंतु त्यानंतर निर्यातीचे करार फार असे वाढले नाहीत.

Advertisement

गेल्या आठवड्यामध्ये इंदूरच्या बाजार समितीत सोयाबीनचा बाजारभाव 5700 रुपयांवरून 5500 रुपयांपर्यंत घसरला होता. अकोला बाजार समितीत सोयाबीन 5800 रुपयांवरून 5600 रुपयांवर घसरले. काही बाजारात तर दर 5,400 रुपयांपर्यंत पोहोचले होते. मात्र या दरात 100 रुपयांची अथवा त्याहून अधिक वाढ होऊ शकते, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. कारण शेतकरी शेतमाल साठवून ठेवत असल्याने बाजारपेठेत आवक वाढत नाहीये. त्यामुळे प्रक्रिया उद्योग करणारे चढ्या दराने सोयाबीन खरेदी करत आहेत. याचा निश्चित बाजारभावावर सकारात्मक परिणाम दिसून होईल.

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

please disable Adblock to proceed to the destination page