Soybean Market Price: सोयाबीचे दर गगनाला भिडले, लातूर बाजार समितीत पुन्हा सोयाबीनला मिळाला विक्रमी बाजारभाव. Soybean Market Price: Soybean prices have skyrocketed, Latur market committee again got a record market price for soybeans.
शेतकरी मित्रांनो शेतीविषयी माहिती व बाजारभाव यांचे दररोज अपडेट देणाऱ्या आपल्या कृषियोजना डॉट कॉम या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे,आज सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची माहिती आम्ही घेऊन आलो आहोत. हा लेख शेवटपर्यंत वाचा.
शेतकऱ्यांसाठी तात्काळ हक्काचा पैसा उपलब्ध करून देणारे खरीप पीक म्हणून सोयाबीनकडे पाहिले जाते,या हंगामात सर्वाधिक शेतकरी सोयाबीन पिकाकडे वळले आहेत,त्यामागील कारण मागील वर्षी सोयाबीनला मिळालेला चांगला बाजारभाव. मात्र यंदाच्या वर्षी परतीच्या पावसाने सोयाबीनच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, उत्पादनात घट आली आहे.
अधिकच्या पाऊसामुळे नुकसानीचे सोयाबीनच्या दर(Soyabin BajarBhav) वाढीवर परिणाम होण्याची शक्यता अधिक शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
आज गुरुवार दि.17 रोजी लातूर जिल्ह्यात सोयाबीनला पुन्हा एकदा सर्वाधिक दर मिळाला आहे,सोयाबीन उत्पादक शेतकरी सोयाबीन विक्री संथ गतीने करत आहेत, बाजार समित्यांत सोयाबीन आवक कमी होत आहे,सोयाबीन बियाणे कंपन्या व त्यांचे प्रतिनिधी बियाणांसाठी चांगल्या दर्जाच्या पिकास अधिकचा दर देऊन खरेदी करत आहेत. परंतु इतर व्यापारी व सोयाबीन स्टॉक साठी इतर खरेदीदारही उच्च दराने खरेदीसाठी गर्दी करत आहेत.
राज्याच्या विविध बाजार समित्यांमध्ये आज सर्वाधिक दर लातूर बाजार समिती मध्ये मिळाला आहे, आज सोयाबीन 6300 रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री झाले. त्याखालोखाल अमरावती जिल्ह्यात चांदुर बाजार समितीत 6116 रुपये क्विंटल इतका दर मिळाला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली बाजार समितीत 6000 रुपये प्रतिक्विंटल इतका दर मिळाला आहे.केंद्र सरकारने सोयाबीनची आधारभूत किंमत 4300 रुपये ठरवली आहे, दिवाळीपूर्वी 4100 पासून सुरू झालेले सोयाबीन बाजार 6 हजार रुपयांच्या पुढे गेले आहेत, लवकरच सोयाबीनला सरासरी 7 हजार रुपयांचा दर मिळेल अशी शेतकरी अपेक्षा करत आहेत.
राज्यात विविध बाजार समित्यांमध्ये किमान दर 4100 रुपये तर कमाल दर 6300 रुपये इतका राहिला आहे, सरासरी दर 5700 रुपये मिळाला आहे.
येत्या काळात सोयाबीन दरात मोठी भाववाढ होईल असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे.
शेतकरी मित्रांनो व व्यापारी बांधवांनो वरील माहिती आवडल्यास इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करायला विसरू नका.
1 thought on “Soybean Market Price: सोयाबीचे दर गगनाला भिडले, लातूर बाजार समितीत पुन्हा सोयाबीनला मिळाला विक्रमी बाजारभाव.”