Soyabin Bajar Bhav: सोयाबीनच्या दरात वाढ, बाहेर देशातून मागणी वाढली,किती दर मिळतोय,पुढे किती मिळणार जाणून घ्या.
Soybean prices in the international market: आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन, सोयाबीन तेल आणि सोयाबीन पेंडीचे भाव अस्थिर राहिले आहेत. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत सोयाबीन आणि सोयाबीन पेंडीच्या दरात किरकोळ घट झाली होती.आज देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा भावही 100 ते 200 रुपयांनी वाढला. सोयाबीनचा सरासरी भाव 5 हजार 400 रुपयांवर पोहोचला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन, सोया तेल आणि सोयामीलचे भाव आज वाढले आहेत. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत सोयाबीनचे दर (Soyabin Bajar bhav) आणि सोयाबीन पेंडीचे दर तुलनेत थोडे कमी होते.
सोमवारी सोया तेलाचे दर किंचित वाढले होते. पण आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे भाव का चढ उतार होत आहे? देशाच्या बाजारपेठेत सोयाबीनचा भाव किती? याची माहिती तुम्हाला या लेखातून मिळेल.
दोन दिवसांपूर्वी बातमी आली होती की चीनमध्ये कोरोनाचा प्रभाव कमी झाला असून बाजार सुरळीत सुरू होईल. चीनमधील कोरोना निर्बंध शिथिल केल्याने सोयाबीन बाजाराला आधार मिळेल, अशी अपेक्षा होती.
त्यामुळे सोयाबीन बाजार( Soyabin Bajar Bhav) सुधारला. पण काल चीनमध्ये गेल्या सहा महिन्यांतील सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारावर जाणवला. आज सुरुवातीच्या टप्प्यात सोयाबीनच्या दरात मोठी घसरण झाली,
मात्र नंतर सोयाबीन दर वाढले, सोयाबीन फ्युचर्स प्रति बुशेल $14.61 पर्यंत घसरले. सोयाबीन तेलाच्या किमती शुक्रवारच्या तुलनेत किंचित सुधारल्या आणि 77.40 सेंट प्रति पौंडवर स्थिरावल्या. सोयाबीन पेंडीच्या दरातही आज किंचित वाढ झाली.
आज सोयाबीन पेंडीचा भाव प्रति टन $420.85 वर पोहोचला.आज देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा( Soyabin Bajar Bhav ) भावही 100 ते 200 रुपयांनी वाढला. सोयाबीनचा सरासरी भाव 5 हजार 400 रुपयांवर पोहोचला आहे.
काही बाजार समित्यांमध्ये तर बियाण्यांच्या दर्जेदार मालाचे दर 5,500 रुपयांपर्यंत पोहोचले होते. देशातील कंपन्यांकडून खरेदी वाढल्याने आज देशाच्या बाजारपेठेत सुधारणा होत राहिली. सध्या सोयाबीनचे दर तेजीत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी कायम राहिल्यास सोयाबीन दर Soybean Prices वाढतच राहतील असा अंदाज आहे, देशात सोयाबीनचे उत्पादन घटले असल्याने भारतात मागणी वाढत आहे,याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.
पण भविष्यात किमतीत काही चढउतार होऊ शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊनच सोयाबीनची विक्री करावी, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.
2 thoughts on “Soyabin Bajar Bhav: सोयाबीनच्या दरात वाढ, बाहेर देशातून मागणी वाढली,किती दर मिळतोय,पुढे किती मिळणार जाणून घ्या.”