Google News

आमचे ताजे अपडेट्स Google News वर वाचा

सोयाबीनची विक्री करावी की साठवणूक, हंगामाच्या अंतिम टप्प्यात काय आहे बाजारपेठेतील स्थिती.? वाचा सविस्तर

सोयाबीनची विक्री करावी की साठवणूक, हंगामाच्या अंतिम टप्प्यात काय आहे बाजारपेठेतील स्थिती.? वाचा सविस्तर. Should soybeans be sold or stored, what is the market position in the last phase of the season? Read detailed

 

शेतकरी मित्रांनो आजपर्यंत आपण सोयाबीनची विक्री करावी की साठवणूक याबाबत शेतकऱ्यांच्या मनात द्विधा मनस्थिती होती. परंतु गेल्या अनेक दिवसांपासून (Soybean Rate) सोयाबीच्या भावात चढ-उतार होत असल्यामुळे विक्री करावी की साठवणूक करावी याबाबत राज्यात शेतकरी संभ्रमात असून, बाजारपेठे मध्ये बाजारभाव वाढले की टप्प्याटप्प्याने सोयाबीन विक्री व दर घसरले की,सोयाबीनची साठवणूक हा पर्याय अनेकांनी स्वीकारला.परंतु या हंगामाच्या अंतिम टप्प्या मध्ये सोयाबीनच्या दरात होणारे बदल व आगामी उन्हाळी सोयाबीनची ( Summer Soybean) होणारी आवक याच्या मुळे सोयाबीनचे भाव काय असतील याबाबत मतमतांतरे आहेत. या द्विधा स्थितीमध्ये शेतकरी अडकले असून, सध्यातरी सोयाबीनच्या दरात काही प्रमाणात घसरण होत असली तरी सोयाबीनची आवक मात्र टिकून आहे. आजपर्यंत एक गणित असायचे जर दर घसरले तर त्याचा आवकवर परिणाम होत असायचा परंतु गेल्या दहा दिवसांपासून 6 हजार 300 रुपयां पर्यंत सोयाबीनचे भाव स्थिरावले आहेत.
लातूर मधील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एकूण 25 हजार सोयाबीन कट्यांची ( पोते ) आवक होत असून सोयाबीन दर स्थिर आहेत.

शेतकऱ्यांच्या मनात संभ्रमावस्था

अद्यापपर्यंत सोयाबीनचे बाजार भाव टिकवून ठेवण्यात शेतकऱ्यांची भूमिका महत्वाची राहिली असून, बाजारपेठेतील हेच सूत्र शेतकऱ्यांच्या लक्षात आले आहे. उत्पन्नात अधिकच्या पाऊसामुळे मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे,कापसाच्या बाबतीत हीच परिस्थिती असून, त्यामुळे या हंगामा मध्ये केव्हा तरी अधिकचा तर मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी अधिक आवक न आणता टप्प्या टप्प्याने सोयाबीनची विक्री सुरू केली होती,यामुळेच दिवाळीच्या दरम्यान 4 हजार 900 रुपये असणारे सोयाबीनचे भाव 6750 रुपयांपर्यंत पोहोचले. परंतु गेल्या आठवड्यापासून सोयाबीनच्या दरात घसरण होत असून गेल्या दोन आठवड्यांपासून सोयाबीन 6200 रुपयांवर स्थिरावला आहे. उन्हाळी सोयाबीनची आवक लवकरच सुरू होईल व त्याचा विपरीत परिणाम सोयाबीनच्या दरावर पहावयास मिळतील. यामुळे शेतकरी मित्रांनी सोयाबीनची विक्री सुरू केली तर ते फायदेशीर ठरेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

काय आहे कृषी तज्ञांचा सल्ला

सध्या सोयाबीनचा हंगाम हा अंतिम टप्प्यात आला आहे. या हंगामात सोयाबीनच्या बाजार भावात चढ-उतार दिसून आला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी घेतलेली भूमिका महत्वाची ठरली असून, सध्या बाजारपेठेत दराच्या बाबतीत बदल दिसत आहे, सोयापेंडच्या दरात देखील घसरण झाली आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोयाबीनला मागणी कमी आहे, यासर्व गोष्टींचा अभ्यास बघता शेतकऱ्यांनी वाढीव दराची अपेक्षा न ठेवता टप्प्या टप्प्याने विक्री सुरू करणे हे सयुंक्तिक ठरेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक न करता विक्री करणे फायदेशीर ठरेल असे तज्ञ व्यापारी सांगत आहेत.

1 thought on “सोयाबीनची विक्री करावी की साठवणूक, हंगामाच्या अंतिम टप्प्यात काय आहे बाजारपेठेतील स्थिती.? वाचा सविस्तर”

Leave a Reply

Don`t copy text!