Mansoon Letest Update 2022मान्सून 2022हवामान अंदाज 2022हवामान अंदाज महाराष्ट्र

कोकण, कोल्हापूर, पुण्यासह महाराष्ट्रात ‘या’ जिल्ह्यात रेड अलर्ट, अतिमूसळधार पाऊस पडणार.

कोकणासह मध्य महाराष्ट्रात 8 ते 11 पर्यंत मोठा पाऊस

कोकण, कोल्हापूर, पुण्यासह महाराष्ट्रात ‘या’ जिल्ह्यात रेड अलर्ट, अतिमूसळधार पाऊस पडणार. Red alert, torrential rains will fall in ‘Ya’ district of Maharashtra including Konkan, Kolhapur and Pune.

कोकणासह मध्य महाराष्ट्रात 8 ते 11 पर्यंत मोठा पाऊस

हवामान विभागाने कोकण,कोल्हापूर, पुणेसह मध्य महाराष्ट्राला सोमवार दिनांक 11 जुलैपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाडा आणि विदर्भ यातील काही भागामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कोकणामध्ये तीन दिवस, तर कोल्हापूर व पुणे या जिल्ह्यामध्ये पुढील दोन दिवस रेड अलर्ट वर्तविण्यात आला आहे,यानुसार शेतकरी बांधवांनी नियोजन करावे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार गोपाळपूर भागावर तीव्र असा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. बंगालच्या उपसागरात व ओडिशामध्ये तसेच महाराष्ट्र व केरळ किनारपट्टी मधील काही भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यात पाऊसाचा जोर आणखी वाढणार आहे. दरम्यान 11 जुलैपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार असा पावसाचा इशारा देण्यात आला आहे,हा इशारा कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांना देखील दिला आहे. 10 जुलैच्या नंतर पाऊसाचे प्रमाण कमी होईल पाऊस काहीशी विश्रांती घेईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. परंत गुरुवारी पावसाचा जोर हा आणखी 1 दिवसाने वाढेल असा नव्याने अंदाज देण्यात आला आहे.

रेड अलर्ट :

(कंसात जुलैमधील तारीख) कोल्हापूर (8 तारखेपर्यंत), पालघर (9 व 10 तारखेपर्यंत), ठाणे (8 तारखेपर्यंत ), मुंबई (8 तारखेपर्यंत ), रायगड (8 व 9 तारखेपर्यंत ), रत्नागिरी (8 व 9 तारखेपर्यंत), सिंधुदुर्ग (8 तारखेपर्यंत ), पुणे (8 व 9 तारखेपर्यंत ), सातारा (8 व 9 तारखेपर्यंत ).

ऑरेंज अलर्ट:

पालघर (9 ते 11 तारखेपर्यंत), ठाणे (9 ते 11 तारखेपर्यंत), मुंबई (9 ते 11 तारखेपर्यंत), रायगड (10 व 11 तारखेपर्यंत), रत्नागिरी (9 ते 11 तारखेपर्यंत), सिंधुदुर्ग (9 ते 11 तारखेपर्यंत), नाशिक (8 तारखेपार्यंत), पुणे (10 व 11 तारखेपर्यंत), कोल्हापूर (9 ते 11 तारखेपर्यंत), सातारा (10 व 11 तारखेपर्यंत), चंद्रपूर (8 तारखेपर्यंत).

यलो अलर्ट :

जळगाव (8 तारखेपर्यंत), जालना (8 तारखेपर्यंत), परभणी, हिंगोली, लातूर (8 तारखेपर्यंत), नंदुरबार, धुळे (8 तारखेपर्यंत), नागपूर, अमरावती, वर्धा, वाशिम, यवतमाळ, गडचिरोली (8 ते 11 तारखेपर्यंत )

साभार – दैनिक पुढारी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Don`t copy text!