Google News

आमचे ताजे अपडेट्स Google News वर वाचा

पंजाब डख हवामान अंदाज : राज्यातील या भागात पडणार पाऊस.

पंजाब डख हवामान अंदाज : राज्यातील या भागात पडणार पाऊस. Punjab Dak Weather Forecast: Rainfall in this part of the state.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ हवामान आहे, येत्या रविवार पासून सुर्यदर्शन होईल असा अंदाज पंजाब डख यांनी वर्तविला आहे. 13 मार्च पासून राज्यात उन्हाचा पारा काही जिल्ह्यामध्ये 44 अंश पर्यंत जाणार असल्याचे सूतोवाच पंजाब डख यांनी केले आहे.
डख हे शेतकऱ्यांना माहीतीस्तव सांगतात की, राज्यात 13 मार्च पासून सुर्यदर्शन होणार आहे व हवामान कोरडे राहील व काही जिल्हातील पारा 38 अंश पासून 44 अंश पर्यंत जाणार आहे. व तसेच दि 11,12 मार्च या तारखेत कोल्हापूर,पूणे,सातारा,सांगली,कराड, महाबळेश्वर,राहूरी,वाई,मलकापूर,माडा,जामखेड,केज, धारूर,बिड,उस्मानाबाद,मुरुड,परभणी.या भागात तुरळक ठिकाणी 11 व 12 मार्च पर्यंत पाउस राहील व परत रविवार 13 मार्च पासून हवामान कोरडे राहील असे पंजाब डख सांगतात.

व शेवटी हे अंदाज आहेत व वारे बदल झाला की, वेळ,ठिकाण,बदलते याची माहीती असावी असेही डख हे सांगतात.

नाव : पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु.पो. गुगळी धामणगाव ता . सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा)
दि.11/03/2022

टीप – शेतकरी मित्रांनो वरील अंदाज हे पंजाब डख यांचे हवामान अंदाज असून,आम्ही या अंदाजांची पुष्टी करत नाही,आपण विचारपूर्वक शेती कामांचे व इतर कामांचे नियोजन करावे.

Leave a Reply

Don`t copy text!