पंजाब डख हवामान अंदाज – 8 जून ते 15 जून दरम्याण राज्यात जोरदार पावसाची हजेरी,या जिल्ह्यात कोसळणार पाऊस.

पंजाब डख हवामान अंदाज – 8 जून ते 15 जून दरम्याण राज्यात जोरदार पावसाची हजेरी,या जिल्ह्यात कोसळणार पाऊस. Punjab Dak Weather Forecast – Heavy rains in the state from 8th June to 15th June, rains in this district.
नमस्कार शेतकरी बांधवांनो, पावसाच्या आशेने आकाशाकडे वाट बघणारे शेतकरी, समस्त जलजीव यांच्या साठी ही आनंदाची बातमी आहे, राज्यात लवकरच जोरदार पावसाचे आगमन होणार असल्याचा हवामान अंदाज आला आहे, आणि हा अंदाज आहे प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब डख यांचा. गेल्या काही वर्षांपासून आपण बघत आलो आहोत की पंजाब डख यांचे हवामान विषयीचे अंदाज अतिशय खरे ठरले आहेत.शेतकऱ्यांनासाठी वरदान असणारे हे अंदाज आज आपण पाहुयात.
– राज्यात जून 8, 9,10,11,12,13,14,15 दरम्याण दररोज भाग बदलत पावसाचे जोरदार आगमण होणार आहे .तसेच (8,9 व10 जून या तारखेत कोल्हापुर सातारा, सागंली,पूणे,नगर ,नाशिक ,सोलापुर, उस्मानाबाद ,लातूर, नादेंड ,यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी ,बिड ,जालना, औरंगाबाद, वैजापूर ,पूणे ,मुंबई, नाशिक, इगतपूरी इत्यादी जिल्ह्यात व त्या भागात जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे.( दि.10,11,12,13,14 या तारखेत हा पाउस उत्त्तर महाराष्ट्र , पूर्व विर्दभ ,प -विदर्भ, जळगाव धुळे बुलढाणा आकोला वर्धा नागपूर या भागात पोहचेल .) हा अंदाज लक्षात घेउन शेतीचे नियोजन करावे असे आवाहन शेतकरी वर्गाला पंजाब डख करतात.
पंजाब डख सांगतात की शेवटी अंदाज आहेत, वारे व त्यांची दिशा यात बदल झाला की, वेळ ,ठिकाण हे बदलत असते हे माहीत असावे.
तरी शेतकरी बांधवांनो आपण आज पुढील 15 तारखे पर्यंतचा पंजाब डख यांचा हवामान अंदाज बघितला आहे. या हवामान अंदाजवर विश्वास असणाऱ्या शेतकरी बांधवांनो आता आपण शेतीचे नियोजन करून आपले शेती कार्य उरकून घ्यावेत.
नाव : पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु.पो. गुगळी धामणगाव ता . सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा)
दि.4/ 06 /2022