Pm Kisan Yojana: अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार ; आज पीएम किसानचे 2 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार.
बऱ्याच कालावधीनंतर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार आहे. प्रधान मंत्री सन्मान निधी योजनेचा 12 वा हप्ता 17 ऑक्टोबर रोजी जारी होत आहे.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, पीएम किसान सन्मान निधीचा 12वा हप्ता जारी होण्यासाठी फक्त काही तास उरले आहे.
17 ऑक्टोबर रोजी नरेंद्र मोदी 2 दिवसीय “प्रधानमंत्री किसान सन्मान संमेलन” चे उद्घाटन करणार आहेत.
यासह, 12 व्या हप्त्यातील 2000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील.
16 हजार कोटींहून अधिक
पीएम किसान सन्मान निधीच्या 12 व्या हप्त्यात 16 हजार कोटींहून अधिक रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवली जाईल.
त्यामुळे देशातील करोडो शेतकऱ्यांना या रकमेचा फायदा होणार आहे. तसेच आर्थिकदृष्ट्या कमकुवत शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळेल.
पीएम सन्मान निधी 12 वा हप्ता
पीएम किसान सन्मान निधी योजना ही शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने चालवली जाणारी योजना आहे.
त्याअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावर 3 हप्त्यांमध्ये 6 हजार रुपये पाठवले जातात. प्रत्येक हप्त्यात 2 हजार रुपये पाठवले जातात.
आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण 11 हप्ते पाठवण्यात आले आहेत.
One Comment