PM Kisan Tractor Yojana: ट्रॅक्टर खरेदीवर मिळणार मोठी सबसिडी, फायदा कसा मिळवायचा ते जाणून घ्या

PM Kisan Tractor Yojana: ट्रॅक्टर खरेदीवर मिळणार मोठी सबसिडी, फायदा कसा मिळवायचा ते जाणून घ्या ( PM Kisan Tractor Yojana: Get big subsidy on tractor purchase, find out how to get benefit )

टीम कृषी योजना / Krushi Yojana

नांगरणे व लावणी असे अनेक कामे शेतकरी ट्रॅक्टरद्वारे करत असतात. भारतात प्रामुख्याने पंजाब राज्यात मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर आहेत,महाराष्ट्रात देखील प्रमाण अधिक आहे. असे अनेक शेतकरी आहेत, ज्यांच्याकडे आर्थिक अडचणींमुळे ट्रॅक्टर नाहीत. स्वतःकडे ट्रॅक्टर नसल्याने भाडोत्री ट्रॅक्टर शेतकऱ्यांना घ्यावे लागते.

PM Kisan Tractor Yojana:
या योजनेद्वारे शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न दुप्पट करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकार मार्फत शेतकर्‍यांच्या हितासाठी अनेक योजना राबविल्या जात असतात. शेतकर्‍यांना शेतीच्या कामासाठी विविध प्रकारच्या मशीनचीही गरज भासत असते. या मध्ये ट्रॅक्टर हा शेतकर्‍यांच्या गरजेचा व अविभाज्य भाग झाला आहे. शेतकरी नांगरणे , शेती कामे व लावणी वगैरे कामे अधिक प्रमाणात ट्रॅक्टरद्वारे करत असतात. भारतात असे अनेक लहान शेतकरी आहेत की ज्यांच्याकडे आर्थिक अडचणींमुळे ट्रॅक्टर नाही किंवा ते घेऊ शकत नाहीत.

शेतात कामासाठी ते ट्रॅक्टर भाडोत्री घेतात अथवा पारंपरिक बैलांचा वापर करतात. अशा
परिस्थितीत ते शेतात कामासाठी ट्रॅक्टर भाड्याने घेतात किंवा पारंपरिक पद्धतीने बैलांचा वापर करतात. अशा या परीस्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्याच्या हेतूने केंद्र सरकारने ट्रॅक्टरच्या खरेदीवर मोठ्या प्रमाणात अनुदान देण्याची योजना सुरू केली आहे.सदरची योजना पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना PM Kisan Tractor Yojana म्हणून ओळखली जाते.

50 टक्के अनुदान मिळणार का.?

केंद्रातील मोदी सरकार शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी अनुदान देत आहे. या योजनेत सर्वात चांगली बाब ही आहे की शेतकरी कुठल्याही कंपनीचे ट्रॅक्टर खरेदी करू शकतात व ते देखील अर्ध्याच किमतीत. उर्वरित अर्धे पैसे अनुदान म्हणून सरकार देत।असते.देशातील अनेक राज्य सरकार त्यांच्या स्तरावर शेतकऱ्यांना ट्रॅक्टरवर 20 पासून ते 50 टक्क्यांपर्यंत अनुदान देत आहे.

योजनेचा लाभ असा घ्या…

एक शेतकऱ्यास केवळ 1 ट्रॅक्टर खरेदी करता येतो शेतकऱ्यांना शासन अनुदान देते. म्हणजे एक शेतकऱ्यास 1 ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान मिळणार आहे. यासाठी आवश्यक बाबी शेतकऱ्याला आधार कार्ड, जमीनीची कागदपत्रे, बँकेचा तपशील, पासपोर्ट आकाराचा फोटो आवश्यक आहे.या योजनेत लाभ घेण्यासाठी शेतकरी जवळच्या कुठल्याही सीएससी (CSC) आपले सरकार केंद्रास भेट देऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker