Pm Kisan : पीएम किसान योजनेच्या लाखो शेतकऱ्यांचे अडकले पैसे ; तुम्हाला मिळालेत का.?

Advertisement

 

टीम कृषी योजना / Krushi Yojana

Advertisement

पीएम किसान योजनेतून देशातील करोडो शेतकऱ्यांना सरकार 6000 रुपये 2000 रुपयांच्या तीन हफत्याद्वारे बँक खात्यात जमा करते. यातील काही शेतकऱ्यांचं पेमेंट फेल झालं आहे.केंद्र सरकारनं शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे पाठवले आहेत परंतु शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले नाहीत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना म्हणजे Pm Kisan योजनेचा आठवा हप्ता मे महिन्यात पंतप्रधान यांनी घोषित केला होता. परंतु पीएम किसान Pm Kisan योजनेची नोंदणी केली आहे अश्या शेतकऱ्यांतील तब्बल एक कोटींहुन अधिक शेतकऱ्यांना योजनेचे पैसे खात्यात जमा झालेले नाहीत. तर अनेक शेतकऱ्यांचे आलेले पेमेंट फेल झालं आहे. केंद्र सरकारनं या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवले परंतु या शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे आलेले नाहीत.

लाखो शेतकऱ्यांचे पैसे अडकले

पीएम किसान Pm kisan योजनेच्या वेबसाईट वरील माहिती नुसार देशातील 11 कोटी 97 लाख 49 हजार 455 शेतकऱ्यांनी योजनेची नोंदणी केली आहे. आजपर्यंत एकूण 10 कोटी 25 लाख 79 हजार 415 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर डीबीटीच्या माध्यमातून आठव्या हप्त्याची Pm kisan 8th Emi रक्कम बँक खात्यात पाठवण्यात आली आहे. परंतु 4 लाख 45 हजार 287 शेतकऱ्यांना योजनेचे पैसे मिळालेलेच नाहीयेत. 6 लाख 84 हजार 912 शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात पैसे पाठवले परंतु त्यांच्या खात्यात ते पैसे अद्यापी जमा झालेले नाही.वरील सर्व आकडेवारी ही 30 जून 2021 पर्यंतची आहे.

Advertisement

सर्वाधिक शेतकऱ्यांचे पैसे आंध्रप्रदेश मधील.

पीएम किसान Pm kisan योजनेचे पैसे खात्यात जमा न होनारे सर्वाधिक शेतकरी आंध्रप्रदेश मधील आहेत. 3 लाख 21 हजार 378 शेतकऱ्याना त्यांच्या बँक खात्यात पैसे मिळालेले नाहीत. उत्तर प्रदेश मधील 87 हजार 466 तर महाराष्ट्रा मधील 23 हजार 605 शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे मिळालेले नाहीयेत.

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

please disable Adblock to proceed to the destination page