Google News

आमचे ताजे अपडेट्स Google News वर वाचा

Onion Rates: कांद्याच्या दरात मोठी वाढ, अहमदनगर जिल्ह्यातील या बाजार समितीत मिळाला 4000 रुपयांचा दर.

Onion Rates: कांद्याच्या दरात मोठी वाढ, अहमदनगर जिल्ह्यातील या बाजार समितीत मिळाला 4000 रुपयांचा दर.

अनेक दिवसांपासून कांद्याच्या दरात होत असणारा चढ उतार, भाववाढीकडे लक्ष देऊन असणारे शेतकरी बांधव यांच्या साठी आनंदाची बातमी आहे, अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील घोडेगाव कांदा मार्केट येथे काल झालेल्या कांदा लिलावात कांद्यास 4000 रुपये प्रतिक्विंटल इतका उच्चांकी बाजारभाव मिळाला असून, आवक कमी झाल्याने कांदा बाजारभाव वाढ झाल्याचे चित्र संपूर्ण बाजार समिती मध्ये दिसून आले.

घोडेगाव (नेवासा) कांदा मार्केट मध्ये सोमवार दि.16 ऑक्टोबर 2023 रोजी नंबर 1 चा कांदा 4000 रुपये क्विंटल दराने विक्री झाला, सर्वात भारी कांद्यास 3500 ते 4000 रुपयांपर्यंत दर मिळाले असून इतर बाजारभाव आपण खाली जाणून घेऊयात.

कृषि उत्पन्न बाजार समिती नेवासा

दिनांक 16 – 10 — 2023

वार सोमवार

शाखा– कृषी उत्पन्न बाजार समिती नेवासा, उपआवार घोडेगाव.

एकुण आवक 22647
गोणी
( 124 गाडी )

एकुण वजन — 1245585 kg

नवीन गावरान मालाचे भाव

फुल गोळा माल — 3000 — 3100
मध्यम मोठा – 2900 – 3000
मध्यम माल 2700- 2800

गोल्टी — 2000 – 2300

गोल्टा -2400– 2700

जोड कांदा व बदला माल — 1000 – 1600 — 1800 – 2000

1/2 वक्वल -3200
— 3300

हलके मोड डागी व कलर कमी माल — 1500 – 1800 –
2000 – 2500

अपवादात्मक भाव –3500 — 4000

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी वरदान असणारे कांदा पीक व त्या कांद्याला मिळणारा बाजारभाव या कडे संपूर्ण देशाचे लक्ष असते, अहमदनगर जिल्ह्यात असणारे नेवासा तालुक्यातील घोडेगाव कांदा मार्केट हे अल्पावधीतच नावारूपाला आले आहे, या ठिकाणी येणारी उच्चांकी कांदा आवक व अवघ्या 4 तासात पार पडणारे कांदा लिलाव अन तात्काळ रोख स्वरूपाचे पट्टी वाटप यामुळे हे मार्केट शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले आहे.

Leave a Reply

Don`t copy text!